मुक्तपीठ टीम
अब्जाधीश एलॉन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सने चार प्रवाशांसह अंतराळात उड्डाण केले आहे. त्यात दोन पुरुष आणि दोन महिला आहेत. विशेष गोष्ट म्हणजे इन्सिरेशन फोर नावाच्या या मिशनमध्ये महिला नेव्हिगेटर शॉन प्रॉक्टर प्रमुख भूमिका बजावत आहे. ती मिशनची पायलट आहे. त्याच वेळी, दुसरी महिला २९ वर्षीय हेले आर्केनो आहे. जी कर्करोगग्रस्त आहे. ती अंतराळात जाणारी सर्वात तरुण अमेरिकन नागरिक आहे. म्हणजे ही मोहीम निम्मी स्त्रीशक्तीच्या बळावर अंतराळात झेपावली आहे.
अंतराळ मोहिमेत स्त्री शक्ती!
- खरं तर, केवळ स्पेसएक्स ही खासगी कंपनीच नाही तर अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने ही २०२४ मध्ये चंद्रावर पहिली महिला प्रवासी पाठवण्याची योजना आखली आहे.
- या वर्षी स्पेस एक्स मंगळावर मानवयुक्त मोहीम पाठवू शकते, ज्यात महिला सदस्याचाही समावेश होऊ शकतो.
- यानंतर, महिला देखील नासाच्या मंगळ मोहिमेत महत्वाच्या भूमिकेत दिसतील.
- शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, जरी सध्याच्या अंतराळ मोहिमेचा उद्देश निधी उभारणे असे सांगितले जात असले, तरी त्यामागे अंतराळातील महिलांसाठी मार्ग मोकळा करणे हाही आहे.
- अनेक संशोधनानुसार, अंतराळ मोहिमांसाठी पुरुषांपेक्षा महिला अधिक योग्य आहेत.
अंतराळ मोहिमेत स्त्रीशक्तीमुळे असाही लाभ!
- स्त्रियांचे वजन कमी असल्यामुळे, इंधनाचा वापर कमी होतो. कॅलरीज देखील २५% कमी खर्च होतात.
- कोणत्याही मोहिमेतील विशेष गोष्ट हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की अंतराळ यानाचे एकूण वजन किमान असावे, कारण वजन वाढल्याने रॉकेटचे अधिक इंधन देखील खर्च होते.
- महिलांचे वजन सामान्यतः पुरुषांपेक्षा कमी असते. म्हणजेच रॉकेटला कमी इंधन खर्च करावे लागेल.
- इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर वर्षभर प्रवास करणारे स्कॉट केली म्हणतात की, अंतराळात मुक्कामाच्या वेळी डोळ्यातून भरपूर पाणी येते, ज्यामुळे रेटिना जाड होते. ही समस्या पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये कमी प्रमाणात आढळते.
अंतराळ मोहिमेत आता ५० टक्के स्त्रीशक्ती, यापूर्वी होती ११ टक्के!
- द ट्रान्सलेशनल रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर स्पेस हेल्थच्या मते, सध्याच्या प्रशिक्षणात सुमारे ५० टक्के अंतराळवीर महिला आहेत.
- पूर्वी हा सहभाग केवळ ११ टक्के होता.
- खरंतर महिलांना संधी नाकारताना दिलेल्या कोणत्याही कारणांचा स्त्रियांच्या क्षमतेशी काहीही संबंध नव्हता.
यापूर्वी अंतराळात झेपावलेल्या महिला
- रशियाची व्हॅलेंटीना तेरेशकोवा १६ जून १९६३ रोजी अंतराळात जाणारी पहिली आणि सर्वात तरुण अंतराळवीर होती.
- तिने पृथ्वीला ४८ वेळा प्रदक्षिणा घातली.
- कॅनडाच्या रॉबर्टा बॉंडर अंतराळात जाणारी पहिली कॅनेडियन महिला होती.
- तेव्हापासून, १९९७ मध्ये भारतीय वंशाच्या कल्पना चावलासह अनेक महिला शास्त्रज्ञांनी अंतराळात प्रवास केला आहे.
पाहा व्हिडीओ