मुक्तपीठ टीम
केरळमध्ये देशातली सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यामुळे कोरोनावर मात करणं हे केरळ सरकारपुढे मोठं आव्हान निर्माण झालं आहे. अशातच आता केरळ उच्च न्यायालयाने कोरोनाविरोधी लसीकरणासंदर्भात एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केरळ उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार, खासगी क्षेत्रांमध्ये कोविशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस हा २८ दिवसांनंतर घेतला जाऊ शकतो. मात्र हा निर्णय मोफत लसीकरण मोहीमेसाठी लागू असणार नाही.
काय म्हटलंय केरळ उच्च न्यायालयाने?
- बैठकींसाठी जाणारे अधिकारी आणि परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना २ डोसमधल्या ८४ दिवसांच्या अंतराला सूट दिली गेली आहे.
- कंपन्यांनी आधीच लसींची खरेदी केलेली असल्याने कोविशिल्डचा दुसरा डोस देण्यास विलंब करणं उचित ठरणार नाही.
- काइटेक्स समूहाने गेल्या महिन्यात दाखल केलेल्या याचिकेत आपण आपल्या कर्मचाऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या लसींची खरेदी केल्याची माहिती दिली आहे.
- परिणामी, दुसरा डोस देण्यास विलंब झाल्यास खरेदी केलेल्या लसी या वाया जाऊ शकतात.
- केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार कोविशिल्डच्या २ डोसमधलं अंतर हे ८४ दिवसांचं आहे.
- मात्र किटेक्स समूहाने याचा विरोध केला आहे. तसंच केंद्राच्या याचिकेला समूहाने विरोध केला आहे.
- कोविशिल्डच्या दुसरा डोस २८ दिवसांच्या कालावधीत दिला जावा, हा कोर्टाचा निर्णय सरकारच्या मोफत लसीकरण मोहीमेसाठी लागू होणार नाही.