मुक्तपीठ टीम
यूपीएससी-सीडीएस मार्फत एकूण ३३९ जागांसाठी संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा आहे. देशातील सेनादलांच्या ट्रेनिंग अकादमींसाठी ही परीक्षा आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २४ ऑगस्ट २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
भारतीय भूदल (मिलिटरी) ॲकॅडमी, डेहराडून १५३ (डीई) येथे १०० जागा, भारतीय नौदल ॲकॅडमी, एझीमाला, एक्झिक्युटिव्ह (जनरल सर्व्हिस)/ हायड्रो येथे २२ जागा, हवाई दल ॲकॅडमी, हैदराबाद येथे ३२ जागा, ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (पुरुष) चेन्नई , ११६ एसएससी (पुरूष) कोर्स (एनटी) येथे १६९ जागा, ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) चेन्नई,-३० एसएससी महिला येथे १६ जागा आहेत.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- पदवीधर
२) पद क्र.२- इंजिनीअरिंग पदवी
३) पद क्र.३- भौतिकशास्त्र आणि गणित विषयांसह पदवीधर किंवा इंजिनअरिंग पदवी
४) पद क्र.४- पदवीधर
५) पद क्र.५- पदवीधर असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १७ ते २५ वर्ष असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या ओबीसी/ जनरल उमेदवारांकडून २०० रूपये शुल्क आकारले जाईल तर, इतर उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी
यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट https://www.upsc.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.