मुक्तपीठ टीम
बालपणी जेव्हा सारेच खेळात मग्न असतात, फारतर त्यांचं कुटुंब त्यांच्या चांगल्या शिक्षणासाठी नामांकित शाळेत प्रवेशासाठी अट्टाहास करक असते, तेव्हा जोगेश्वरीच्या घोसाळकर कुटुंबाने मात्र आपल्या स्वराजला भारतीय सेना दलात अधिकारी बनवण्याचं स्वप्न पाहिलं. त्यांचं स्वप्न हे स्वराजचं स्वप्न झालं. नव्हे तो जणू तेच बाळकडू घेऊन जन्माला आला, कारण लहानपणारासून स्वराज हा फक्त आणि फक्त सेनादलातच जाण्याचं स्वप्न उरी बाळगून होता. आणि आता अखेर ते स्वप्न साकारलंय. या तरुणाची निवड एनडीएसाठी झालीय.
आपण आपल्या दैंनदिन जीवनात जे कष्ट, मेहनत घेत असतो त्यापाठी आपला उद्देश असतो. कठोर परिश्रम हा एक मार्ग आहे ज्याद्वारे आपण आपल्या जीवनात काहीही साध्य करू शकतो. आवश्यकता असते ती परिश्रमांना योग्य दिशाही मिळण्याची. मुंबईतील जोगेश्वरीतील स्वराज घोसाळकरने बालपणीच सेनादलाची दिशा निवडली. त्याने ती मनात भिनवली. आणि अखेर त्याची यूपीएसई- एनडीए-२०२० परीक्षेत देशपातळीवरील गुणवत्ता यादीत प्रथम प्रयत्नात १४९व्या क्रमांकावर निवड झाली आहे. स्वराजच्या या यशामुळे त्याच्या कुटंबाला आनंद झाला आहे.
दहावीला गेल्यावर बहुतांशी पालक मुलांच्या पुढील भविष्याच्या वाटचाली धावपळ करत असतात. मात्र स्वराजची उच्चशिक्षत समाजसेविका आई सुरक्षा घोसाळकर आणि उद्योजक वडील शशांक घोसाळकर यांनी स्वराजच्या जन्मापासूनच त्याला सेना अधिकारी बनवण्यासाठी घडवलं. त्यांनी त्याच्यासाठी तसेच नियोजन केले. स्वराजने केंद्रीय विद्यालय आयआयटी, पवई शाळेत इयत्ता दहावी सीबीएसई बोर्डात ९२% गुण प्राप्त केले होते. अभ्यासासोबत धनुर्विद्येत राष्ट्रीय पातळीवर रौप्य पदक, स्काउटचा राज्यपुरस्कार, इयत्ता पाचवी ते दहावी सिकॕडेटचे प्रशिक्षणात प्राविण्य मिळविले आहे. आई – वडील , आजीचे संस्कार आणि घडवणाऱ्या शिक्षकांमुळे मला हे यश मिळल्याचे स्वराज घोसाळकरने सांगितले.
स्वराज घोसाळकरचं यश कुटुंबाचं स्वप्न…
- युपीएसई एनडीए २०२० परीक्षेत देशपातळीवरील गुणवत्ता यादीत झालेली स्वराज घोसाळकरची प्रथम प्रयत्नातील निवड ही त्याच्या कुटुंबियांच्या स्वप्नाची पूर्ती आहे.
- स्वराजची आई सुरक्षा घोसाळकर , उद्योजक वडिल शशांक घोसाळकर, जन्मापासून संस्कार आणि संगोपनाची जबाबदारी घेणारी आजी गं.भा. नर्मदा लक्ष्मण पेडणेकर यांनी स्वराजचं स्वप्न आपलं मानलं, त्याच्यासारखंच परिश्रम केलं.
- बहुतांश पालक इयत्ता दहावी मध्ये करिअर मार्गदर्शन आणि समुपदेशनाची धावपळ करतात, परंतू स्वराजच्या पालकांनी त्याच्या बालपणापासूनच तो सेना अधिकारी होण्यासाठी नियोजन केले होते. स्वराजनेही त्याचे शिक्षक, मार्गदर्शक आणि पालक यांच्या मार्गदर्शनाने पुढची वाट परिश्रमपूर्वक चालली.
स्वराजचं शैक्षणिक यशही घवघवीतच!
- स्वराजने केंद्रीय विद्यालय आयआयटी, पवई शाळेत इयत्ता दहावी सीबीएसई बोर्डात ९२% गुण प्राप्त केले.
- तो अभ्यासासोबत धनुर्विद्येत राष्ट्रीय पातळीवर रौप्य पदक, स्काउटचा राज्यपुरस्कार , इयत्ता पाचवी ते दहावी सिकडेटचे प्रशिक्षणात प्राविण्य मिळविले.
- बारावी सायन्स सोबत एनडीएच्या पूर्व तयारी करीता त्याला कोल्हापूरच्या आर्म फोर्स प्रिपरेटरी इन्स्टिटयुटचे चेअरमन विश्वास कदम सर , संचालक मेजर चंद्रसेन कुलथे सर, शिक्षक अजय पाटील सर यांच्या सोबत एनसीसीचे दिलिप नारकर सर, कर्नल सुकुमारन सर, शारिरीक प्रशिक्षक शिवशंकर वाले सर, धनुर्विद्या प्रशिक्षक वैभव सागवेकर सर, भारत स्काऊट गाईड संस्थेचे राष्ट्रीय प्रशिक्षक तसेच महाराष्ट्र जिल्हा उपायुक्त संतोष परंडवाल सर यांचे मार्गदर्शन लाभले.
- कोरोना संकट काळातही मुंबई येथून लेखी परीक्षेसाठी कर्नाटक आणि मुलाखतीकरीता विशाखापट्टणम येथे सुरक्षितपणे पोहचण्या करीता अखिल भारतीय मराठा महासंघाचे हंबीरराव शिंदे , परिमंडळ -१० चे पोलिस सहआयुक्त गोयल सर , वरिष्ठ पोलीस निरीक्षिका शुभदा चव्हाण मडम , पत्रकार संदिप कसालकर आणि आशिर्वाद लाभले.
स्थानिक आमदार वायकरांकडून कौतुक
“मध्यमवर्गीय कुटुंबातील स्वराजचे हे यश नक्कीच कौतुकास्पद असून तुझ्या पावलावर पाऊल ठेवत जोगेश्वरी मधील इतर अनेक विद्यार्थी देखील एनडीएत जाण्याची प्रेरणा लाभेल. तुझ्या यशाने जोगेश्वरीकर व मुंबईच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेल्या असल्याची भावना या निमित्ताने स्थानिक आमदार व माजी राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी व्यक्त केली.