मुक्तपीठ टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामागोमाग काही वेळातच केंद्रीयमंत्री नारायण राणे हे चिपळूणच्या बाजारपेठेत पोहचले. तेथे चिपळूणकर व्यापाऱ्यांनी नारायण राणेंना मदतीसाठी साद घातली. त्यांची दखल घेत राणे यांनी महत्त्वाच्या तीन मागण्यांचं निवेदन तयार करण्यास सांगून फॅक्स करण्यास सांगितले. आम्ही आमच्या पातळीवर केंद्र आणि राज्यस्तरावरून तुम्हाला मदत मिळवून देऊ, असंही राणे यांनी व्यापाऱ्यांना आश्वस्त केलं.
दरडग्रस्त तळीयेलाही राणेंची भेट
- चिपळूणला येण्यापूर्वी राणे आधी सकाळी रायगड जिल्ह्यातील तळीयेमध्ये गेले होते.
- तेथेही त्यांनी आपत्तीग्रस्तांना मदतीचे आश्वासन दिले.
- या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना केंद्र आणि राज्याने मदत दिली आहे.
- सर्व दरडग्रस्तांचं पुनर्वसन करण्यात येईल.
- पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सर्वांना पक्की घरं बांधून दिली जातील.
रायगड जिल्ह्यातील तळीये गावाला भेट देऊन पुरग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या. तळीये गावात पंतप्रधान आवास योजनेतून घरे बांधून देण्यात येतील. तसेच स्थानिक नागरीक सांगतील तेथेच पुनर्वसन केले जाईल. केंद्र सरकार पूरग्रस्तांना सर्वोतोपरी मदत करेल, असे आज येथील लोकांना आश्वस्त केले. pic.twitter.com/EJB7805L08
— Narayan Rane (@MeNarayanRane) July 25, 2021
स्थानिकांना पाहिजे तेथे पुनर्वसन
- या गावातच आपलं पुनर्वसन व्हावं अशी गावकऱ्यांची इच्छा आहे.
- गावातच पुनर्वसनासाठी तात्पुरती वसाहत तयार करण्यात येणार आहे.
- गावकरी सांगतील तिथे त्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- केंद्राकडूनही स्थानिकांना मदत देण्यात येणार आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदींना या आपत्तीची माहिती दिली जाईल. नुकसानाचं स्वरुप सांगितलं जाईल.
- त्यांनी मला या भागाची पाहणी करून अहवाल देण्यास सांगितलं आहे, असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितलं.