मुक्तपीठ टीम
अतिवृष्टीनं महराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना झोडलं आहे. त्यातच काही ठिकाणी डोंगराळ गावांमध्ये दरडी कोसळ्यानं मोठ्या प्रमाणावर जीवितहानीही झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगडनंतर रत्नागिरीतील आपत्तीग्रस्त भागांना भेट देऊन आपत्तीग्रस्तांच्या समस्या समजून घेतेल्या.पण सवंग लोकप्रियतेसाठी कोणतीही घोषणा करणार नाही, असंही स्पष्टपणे बजावल, पण तसं करतानाच, कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, असा शब्दही दिला.
महापुरामुळे ज्यांचं शेती, घरदार आणि दुकानांचं नुकसान झालं आहे. त्या सर्वांना तातडीने मदत केली जाईल. माझ्याकडे आर्थिक नुकसानीचा अहवाल येईल. अहवाल आल्यावर सर्वंकष मदत केली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूणमधील पूर परिस्थितीची पाहणी केली. आपत्तीग्रस्त व्यापाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
उद्धव ठाकरेंचा सवंग घोषणाबाजीला विरोध, पण दिलासा दिला!
- आपण हवामान बदल हा शब्द ऐकून होतो, आता त्याचा फटका बसू लागला आहे.
- मी तळीये गावात गेलो होतो. दरडी कोसळायला लागल्या आहेत. वर्षानुवर्षे असलेल्या गावांवर दरडी कोसळत आहेत.
- क्षणार्धात या दरडीखाली लोक दबून जात आहे.
- आताचा पाऊस पडला त्याला केवळ अतिवृष्टी म्हणता येत नाही. हा भयानक पाऊस होता.
- हे आता सातत्याने होत आहे. पावसाची सुरुवात चक्रीवादळाने होत असते.
- अचानक कुठे तरी ढगफुटी होते. पूर येतो. जीवितहानी होते.
- पिकांचं नुकसान होतं. विध्वंस होतो सगळीकडे. हे दरवर्षी होत आहे.
एकत्रित आढाव घेऊन मदत करू
- केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी मी आत्ता लगेच काहीतरी घोषणा करणार नाही.
- राज्यातील पूर परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊन त्यानंतरच नुकसानभरपाई संदर्भामध्ये जाहीर करण्यात येईल.
- केंद्राकडून काय आणि किती मदत मागायची ते ठरवता येईल.
- तात्काळ मदत केली जाईल.
- अनेकांच्या अंगावर जेवढे कपडे आहेत तेवढेच कपडे त्यांच्याकडे आहेत. घरातील धनधान्य वाहून गेले आहेत.
- त्यामुळे त्यांना सर्वात आधी त्याबाबतची मदत दिली जाणार आहे. तिथे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त आहेत. त्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत.
- आर्थिक मदत सुद्धा करू. उद्या फक्त एक आढावा येऊ द्या. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सांगली, सातारा यांचा एकत्रिच आढावा घेऊन तात्काळ मदत घोषित करू.
विमा भरपाईत तांत्रिक अडचणी येणार नाहीत!
- रस्ते वाहून गेले आहेत. काही ठिकाणी पूल वाहून गेले आहेत.
- मोठं नुकसान झालं आहे.
- पिकांचं नुकसान झालं आहे.
- सर्वांचा एकत्रित आढावा घेऊन जे शक्य होईल जे आवश्यक आहे ते सगळे पुरवले जाईल.
- ज्यांचा विमा आहे. त्यांना कोणत्याही अडचणी येऊ देणार नाही. तांत्रिक मुद्दे उपस्थित होऊ दिले जाणार नाहीत.
- मी त्याबाबत सूचना दिलेल्या आहेत.
- ज्यांनी विमाकवच घेतलं नसेल त्यांनाही मदत करा.
- यामध्ये तांत्रिक अडचणी येणार नाहीत, याकडे लक्ष द्या, अशी सूचना दिलेली आहे, असं त्यांनी सांगितलं.
प्रत्येक जिल्ह्यात एनडीआरएफची टीम उभारणार
- संकटांची मालिका आणि संकटांमधील वारंवारता पाहिल्यानंतर आता प्रत्येक जिल्ह्यात एनडीआरएफ सारखी टीम उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे.
- कारण बाहेरची टीम येईल तोपर्यंत इथली टीम मदत कार्याला लागेल. मी हवाईदलाच्या हेलिकॉप्टरने आलो.
- मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर आहे ना, मग या हेलिकॉप्टरने का आलो? कारण हवामान.
- काल मी तळीये गावात गेलो. तिथेही पाऊस सुरु झाला होता.
- अशा हवामानात एनडीआरएफची टीम किंवा इतर टीम पोहोचल्या पाहिजेत.
- काही ठिकाणी दरडी कोसळल्या त्याठिकाणी माणसं जाऊ शकत होती. पण यंत्रसामग्री नेणं कठीण होतं.
- तिथे रस्तेच नव्हते. रस्ते साफ करुन तिथे यंत्रसामग्री पोहोचवण्याचा प्रयत्न केल्याने तिथे दुर्देवाने टीमला पोहोचायला वेळ लागला, असं त्यांनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी चिपळूण येथे दाखल होताच, चिपळूण बाजारपेठ येथे जाऊन व्यावसायिक, दुकानदार यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली तसेच त्यांची विचारपूसही केली. pic.twitter.com/S09ueA982r
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 25, 2021
केंद्राकडे वस्तुस्थितीवर आधारीत मागणी, आता जी लागेल ती मदत राज्य करणार!
- सोमवारी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा आहे.
- माझ्यासोबत मुख्य सचिवही आले आहेत.
- काम सतत चालू आहे. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन होता.
- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, तसेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचाही फोन येऊन गेला.
- त्यांनी एनडीआरएफ, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स जे आवश्यक असेल ते सर्व देण्याचं आश्वासन दिलं.
- आता दूरगामी योजना आपण लागू करणार आहोत त्यासाठी त्यांची मदत आपल्याला लागेल.
- कोरोनामुळे सर्वांची आर्थिक परिस्थिती आणि अर्थव्यवस्था मंदावलेली आहे. त्यामध्ये संकटातून संकटं येत आहेत.
- या संकटसमयी केंद्राकडूनही मदत होत आहे. आज मी त्यांच्याकडे एवढे हजार कोटी द्या, अशी मागणी करणार नाही.
- आपण वस्तुस्थितीवर आधारीत मागणी करू. सर्व परिस्थितीचा आढावा घेतल्यावर मागणी करु.
- आता तात्काळ महाराष्ट्र सरकारकडून जी मदत लागेल ती केली जाईल.