मुक्तपीठ टीम
प्रगत संगणन विकास केंद्रात म्हणजेच सीडॅकमध्ये प्रोजेक्ट इंजिनीअर या पदासाठी ५१ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३ जुलै २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) प्रथम श्रेणी बी.ई/ बी.टेक/ एम.टेक/ एम.ई (कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/ आयटी/ इलेक्ट्रॉनिक्स) / एमसीए २) १ ते ५ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३० वर्षापर्यंत असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून २०० रुपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईडब्ल्यूएस/ महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी
सीडॅकच्या अधिकृत वेबसाइट https://www.cdac.in/ वरून माहिती मिळवू शकता.