मुक्तपीठ टीम
कोरोनाची दुसरी लाट मंदावत असताना आता कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंट भारतासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटची प्रकरणे सातत्याने वाढत असून हा आकडा देशभरात हा आकडा ४०वर पोहचला आहे. महाराष्ट्रासाठी डेल्टा प्लस व्हेरिएंट हा अधिकच चिंता वाढवणारा ठरत आहे. कारण देशातील डेल्टा प्लस व्हेरिएंटचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत.
डेल्टा प्लसबद्दल भीती का?
• केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने खास सावधगिरीचा इशारा दिला आहे.
• डेल्टा प्लस हा कोरोनाचा सर्वात चिंताजनक व्हेरिएंट आहे.
• ज्यात वेगाने संसर्ग, फुफ्फुसांवर तीव्र परिणाम आणि मोनोक्लोनल अॅन्टीबॉडी प्रतिसादात कमतरता, अशी लक्षणे समोर येत आहेत.
• सर्वात चिंतेची बाब म्हणजे हा व्हेरिएंट प्रतिबंधक लस आणि प्रतिकारशक्तीवर थेट प्रभाव टाकू शकतो.
• कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या भारतीय लस डाल्टा प्लस या व्हेरिएंट विरुद्ध लढण्यास सक्षम आहेत.
• पण त्या कितपत अॅन्टीबॉटी तयार करु शकतात यासंबंधितील माहिती अद्याप समोर आलेली नसून त्यावर संशोधन सुरु आहे.
कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे जगभर अलर्ट
• कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंट सर्वप्रथम युरोपमध्ये मार्च महिन्यात समोर आला होता.
• डेल्टा प्लस व्हेरिएंट आढळलेल्या दहा देशांमध्ये भारत आहे.
• दरम्यान, महाराष्ट्र, केरळ, मध्य प्रदेश आणि कर्नाटक या चार राज्यांत डेल्टा प्लसने हातपाय पसरविण्यास सुरुवात केली आहे.
• तसेच डेल्टा प्लस व्हेरिएंट भारता व्यतिरिक्त अमेरिका, ब्रिटन, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड, जपान, पोलंड, नेपाळ, चीन आणि रशियामध्ये आढळला आहे.