मुक्तपीठ टीम
टाटा समुहाचा भाग बनलेली 1MG ही ऑनलाइन फार्मसी आता पुढच्या टप्प्यावर काम सुरु करत आहे. आता लवकरच कंपनी एक्सप्रेस डिलिव्हरी सुरु करणार आहे. या सेवेच्या माध्यमातून ते एका तासाच्या आत ग्राहकांना औषधं पोहोचवतील. टाटा समूहाने नुकतेच या कंपनीला ताब्यात घेतले आहे. त्यानंतर नव्या कल्पनांवर नव्या वेगानं काम सुरु झाले आहे.
सध्या नवी दिल्ली आणि गुरुग्राममधील काही भागात ऑर्डर मिळाल्यापासून ४ ते ५ तासांच्या आत औषधांची डिलिव्हरी सुरू झाली आहे. ही सेवा देशभरात सिंगल एक्स्प्रेस डिलिव्हरीच्या नावाखाली घेण्याची योजना आहे. तसेच, टाटा समुहाने 1 MG खरेदी केल्यानंतर हा पहिला महत्त्वपूर्ण टप्पा असेल. औषधांची डिलिव्हरी एक किंवा दोन तासांत मागणीनुसार करणे हे एक मोठे पाऊल आहे. कारण त्यासाठी खूप मोठा खर्च येईल. त्याचबोरबर ग्राहक कमी किंमतीची औषधे मागवतील याचीही भीती आहे. यामुळे खर्च अधिक वाढू शकेल.
किमान ६०० रुपयांची खरेदी आवश्यक
• ई-फार्मसी प्लॅटफॉर्मवर ऑर्डरचे सरासरी १२०० ते १५०० रुपये आकारले जातात.
• तर एक्सप्रेस डिलीव्हरीसाठी ते ६०० रुपये असेल.
• प्लॅटफॉर्ममध्ये किमान खरेदीची रक्कम फिल्टर न केल्यास ते आणखी कमी असू शकते.
• १ एमजी ग्राहकांना एका तासाच्या आत औषधं पोहोचवण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी बरीच मागणी आहे.
• साथीच्या आजारानंतरच याची मागणी वाढली आहे.
• लोकांना कमीतकमी वेळेत विविध औषधं आणि आरोग्य सेवा संबंधित उत्पादनांची आवश्यकता आहे.
• त्यामुळे या योजनेला वेग देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
औषधांच्या लवकरात लवकर डिलिव्हरीसाठी मागणी
• सवलतीच्या बदल्यात ग्राहक एक्स्प्रेस डिलिव्हरीला प्राधान्य देतात पण त्यास काही मर्यादाही असतात.
• ई-फार्मसी प्रत्येक ऑर्डरवर सरासरी २० ते २५% सवलत देतात.
• काही केमिस्ट दुकाने अशा सवलतींना विरोधही करत आहेत.
• सध्या ही सवलत १२ ते १५% दिली जात आहे.
• ई-औषध डिलिव्हरीला कोरोना काळात मोठा फायदा झाला.
• औषधे लवकरात लवकर डिलिव्हरी करावीत अशी ग्राहकांची मागणी वाढत आहे.