मुक्तपीठ टीम
सोमवारी खूप खाली दिसलेली महाराष्ट्रातील नवी रुग्णसंख्या मंगळवारी ८ हजार ४७० आहे. हा २ हजार २०० रुग्णांचा फरक हा रविवारच्या वीकेंड मूडचा परिणाम सोमवारी रुग्णसंख्या घटण्यात दिसत असल्याने आला असावा, असे मानले जाते. त्यामुळे सोमवारी राज्याच्या प्रत्येक विभागात घटलेली रुग्णसंख्या आज महाराष्ट्रातील प्रत्येक विभागात वाढलेली दिसत आहे. त्यातही पश्चिम महाराष्ट्रात ती १५४० ने वाढल्याचे दिसते. अर्थात हे वीकेंड मूडचे साइड इफेक्ट असावेत. आजही एकेरी नवी रुग्णसंख्या असलेले सहा जिल्हे आहेत.
कोरोना रुग्णसंख्येची ठळक माहिती
- आज राज्यात ८,४७० नवीन रुग्णांचे निदान.
- आज ९,०४३ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ५७,४२,२५८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.९% एवढे झाले आहे.
- राज्यात आज १८८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. १८८ मृत्यूंपैकी १४३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.९८% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,९८,८६,५५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९,८७,५२१ (१५.०१टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ६,५८,८६३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ४,१९६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज एकूण १,२३,३४० सक्रिय रुग्ण आहेत.
एकेरी रुग्णसंख्येचे ६ जिल्हे
- चंद्रपूर ७
- गडचिरोली७
- हिंगोली ६
- गोंदिया ३
- नंदूरबार २
- भंडारा १
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ०४,२६७ (कालपेक्षा वाढ)
- महामुंबई ०१,७८४ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा वाढ)
- कोकण ००,९५८ (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा वाढ)
- उ. महाराष्ट्र ००,६६२ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा वाढ)
- मराठवाडा ००,४७६ (कालपेक्षा वाढ)
- विदर्भ ००,३२३ (कालपेक्षा वाढ)
एकूण नवे रुग्ण ८ हजार ४७० (कालपेक्षा २ हजार २००ने जास्त)
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण
आज राज्यात ८,४७० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५९,८७,५२१ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई महानगरपालिका ५६८
- ठाणे १०७
- ठाणे मनपा ७७
- नवी मुंबई मनपा १०२
- कल्याण डोंबवली मनपा ७४
- उल्हासनगर मनपा ३
- भिवंडी निजामपूर मनपा ४
- मीरा भाईंदर मनपा ३३
- पालघर १३५
- वसईविरार मनपा ६९
- रायगड ५१२
- पनवेल मनपा १००
- ठाणे मंडळ एकूण १७८४
- नाशिक १२८
- नाशिक मनपा ६३
- मालेगाव मनपा २
- अहमदनगर ४२२
- अहमदनगर मनपा ९
- धुळे ७
- धुळे मनपा ८
- जळगाव १९
- जळगाव मनपा २
- नंदूरबार २
- नाशिक मंडळ एकूण ६६२
- पुणे ६८९
- पुणे मनपा २३२
- पिंपरी चिंचवड मनपा १८३
- सोलापूर ३३७
- सोलापूर मनपा ८
- सातारा ७५७
- पुणे मंडळ एकूण २२०६
- कोल्हापूर ९४५
- कोल्हापूर मनपा २५४
- सांगली ६८१
- सांगली मिरज कुपवाड मनपा १८१
- सिंधुदुर्ग ४४४
- रत्नागिरी ५१४
- कोल्हापूर मंडळ एकूण ३०१९
- औरंगाबाद ८१
- औरंगाबाद मनपा २४
- जालना १७
- हिंगोली ६
- परभणी ३०
- परभणी मनपा ६
- औरंगाबाद मंडळ एकूण १६४
- लातूर २९
- लातूर मनपा ३
- उस्मानाबाद ६८
- बीड १४६
- नांदेड ३६
- नांदेड मनपा ३०
- लातूर मंडळ एकूण ३१२
- अकोला २०
- अकोला मनपा १२
- अमरावती ६५
- अमरावती मनपा ३०
- यवतमाळ २२
- बुलढाणा ७७
- वाशिम २८
- अकोला मंडळ एकूण २५४
- नागपूर १४
- नागपूर मनपा १९
- वर्धा १८
- भंडारा १
- गोंदिया ३
- चंद्रपूर ५
- चंद्रपूर मनपा २
- गडचिरोली ७
- नागपूर एकूण ६९
- एकूण ८४७०
- (टीप– आज नोंद झालेल्या एकूण १८८ मृत्यूंपैकी १४३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या २९४ ने वाढली आहे. हे २९४ मृत्यू, नाशिक-७०, ठाणे-५५, अहमदनगर-३३, पुणे-२४, नागपूर-२२, सांगली-१५, सातारा-१४, औरंगाबाद-९, रत्नागिरी-९, अकोला-८, भंडारा-५, पालघर-५, यवतमाळ-५, रायगड-४, उस्मानाबाद-३, जळगाव-२, लातूर-२, सोलापूर-२, बीड-१, चंद्रपूर-१, धुळे-१, जालना-१, कोल्हापूर-१, परभणी-१ आणि सिंधुदुर्ग-१असे आहेत.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य खात्याच्य २२ जून २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.