मुक्तपीठ टीम
कल्याण डोंबिवलीमध्ये सध्या पोस्टर युद्ध रंगले आहे. शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांमध्ये विकास कार्याचे श्रेय घेण्यावरून पोस्टरबाजी सुरु आहे. त्याबद्दल बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी भाजपाला फटकारले. ते म्हणाले, “कुणाला कितीही पोस्टर लावू द्या. त्याने काही फरक पडत नाही. त्यांना पोस्टर लावू द्या. काम आम्हीच करतोय. लोकांची कामं कोण करत आहे आणि लोकांच्या मदतीला कोण धावून जात आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे!” त्यांनी नाव घेतले नसले तरी त्यांचा हा खोचक टोला भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनाच लगावण्यात आल्याचे मानले जाते.
डोंबिवलीतील रस्ते कामाची माहिती देण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवली जिमखाना येथे पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषदेतच त्यांनी पोस्टरबाजीच्या मुद्द्यावर भाजपाला फटकारले.
वचनपूर्ती
५ वर्षांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश.डोंबिवली MIDC निवासी विभाग व औद्योगिक विभागातील रस्त्यांकरिता एकूण रू.११० कोटी निधी मंजूर.निविदा प्रक्रिया पूर्ण करून लवकर काम सुरू करण्याचे निर्देश
२०-२५ वर्षे रखडलेला या रस्त्यांचा प्रश्न निकाली @CMOMaharashtra @OfficeofUT pic.twitter.com/hMnbwOkzYy
— Dr Shrikant Eknath Shinde (@DrSEShinde) June 2, 2021
आमचे कार्य लोकांसाठी, लोकांसमोर!
• विकासासाठी कल्याण लोकसभा मतदार संघातील नागरिकांसाठी आवश्यक ते सर्व करण्याकडे आमचे लक्ष आहे.
• बाकी कोण काय करत आहेत, त्यापेक्षा मी काय करतो यावर माझा जास्त भर असतो. पोस्टर कोणीही लावावेत काम होण्यात लोकाना रस असतो.
• आम्ही जे काम केले आहे. ते लोकांसमोर आहे.
• हे ११० कोटींचे काम असेल, कोरोना काळातील काम तसेच पत्री पूल, दुर्गाडी पूल ही कामे आम्ही केली आहेत, त्याची लोकांना जाणीव आहे.
डोंबिवलीतील विकास कार्य
• डोंबिवली निवासी आणि औद्योगिक विभागात ३५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचा विकास केला जाणार आहे.
• रस्ते विकासासाठी ११० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
• डोंबिवलीतील निवासी आणि औद्योगिक परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती आणि काँक्रिटीकरण रखडले आहे.
• या मुद्द्यावर जानेवारी महिन्यात एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन यांच्यासोबत बैठक झाली.
• कल्याण डोंबिवली महापालिका आणि एमआयडीसी रस्ते विकासासाठी प्रत्येकी ५० टक्के खर्च करणार आहे.
• महापालिकेने ४० टक्के रस्त्यासाठी निविदा काढल्यावर एमआयडीसीकडून ६० टक्के कामे हाती घेतली जाणार आहेत.
• कल्याण डोंबिवली महापालिका ५५ कोटी १५ लाख रुपयांचा निधी एमआयडीसीकडे वर्ग करणार आहे.
• एमआयडीसीकडून पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत ५७ कोटी ३७ लाख रुपये अनुदान स्वरुपात देण्याचे आदेश जारी झाले आहेत.