मुक्तपीठ टीम
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमदार भाई जगताप यांनी लसीकरणावरुन केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणावर हल्लाबोल केला आहे. देशातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करायला हवे होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ती जबाबदारी राज्य सरकारांवर टाकली आहे. असे सांगायचे आणि दुसरीकडे लसीचा पुरवठा होणार आहे त्याबाबतीत रेशनिंग करायचे अशी परिस्थिती विचित्र आहे. त्यात पुन्हा जगातील ९३ देशांमध्ये लस पुरवून आपल्याच देशात लस नाही, अशी विचित्र परिस्थिती निर्माण केली आहे. त्यामुळे “मोदीजी, आमची लस परदेशात का पाठवली?” असा प्रश्न विचारणारे टी-शर्ट घालून मंगळवारी काँग्रेसचे कार्यकर्ते मुंबईत आंदोलन करणार आहेत.
देशात कोरोनाच्या संकटामुळे दयनीय परिस्थिती आहे, असे सांगत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमदार भाई जगताप म्हणाले की, दुर्दैव असे आहे की, जगभरातल्या देशांकडून माझा देश काय शिकला, असा जर मी प्रश्न केला तर त्याचे उत्तर मलाही सापडत नाही आहे.
भाई जगतापांचा लसीकरणावरून हल्लाबोल
• देशात कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आहे.
• वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येने भयानक परिस्थिती निर्माण होत आहे.
• ४५ वर्षांवरील नागरिकांचे कोरोनाविरोधी लसीकरण केंद्र सरकार करत आहे.
• १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरणही केंद्रानेच करायला हवे होते, त्याबाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी असे कस म्हणू शकतात की राज्य सरकारने याची जबाबदारी घ्यावी.
• जगभरात त्या त्या देशांच्या राष्ट्राध्यक्षांनी देशातील नागरिकांचे लसीकरण करुन घेतले आणि तेही मोफत केले आहे.
• माझ्या देशात मात्र पंतप्रधानानी सांगितले होते की कोरोना संपला. पंतप्रधान कसे सांगू शकतात?
देशाची लस परदेशात का?
• पंतप्रधान मोदी देशातील नागरिकांची लस बाहेरील देशात पाठवतात भाजपचे नेते त्यांचे समर्थन करतात.
• मान्य आहे की, बाहेरील देशातून कच्चा माल येतो त्यामुळे त्यांना कराराप्रमाणे काही भाग द्यावा लागणार. परंतु ९३ देशांशी आपला करार नाही.
• त्यांना आपण १५० रुपयांनी लस विकायची आणि आम्हाला आता स्पुटनिक लसीचा डोस घ्यायला १००० रुपये मोजावे लागतात. हा काय प्रकार आहे? आम्हाला कळत नाही.
• याबाबतीत मोदी सरकारचा निषेध करतो आहे. राज्यातील विरोधी पक्षनेत्यांचा आणि विरोधी पक्षाचाही निषेध करत आहे.
मोदीजी, हमारी बच्चों की व्हॅक्सीन विदेश क्यों भेजी? टी शर्टसह आंदोलन
• यापूर्वीही देशात अनेक लसी उपलब्ध झाल्या आहेत.
• पोलिओसारख्या १३ लसींसाठी कधी रांग लावाली लागली नाही.
• सर्व लसींचे डोस मोफत देण्यात आले आहेत.
• आता मात्र रांग लावा, पैसे द्या, असे प्रकार सुरु आहेत.
• केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणाविरोधात मंगळवार पासून आंदोलन करण्यात येणार आहे.
• मोदी आमच्या मुलांची लस परदेशात का पाठवली अशा वाक्याचे बॅनर आम्ही लावले होते.
• या बॅनरला फाडण्याचा, काढण्याचा प्रयत्न झाला परंतु आम्ही तिथे नवीन बॅनर लावले आहेत.
• आंदोलन आता अधिक तीव्र करण्यात येणार आहे.
• मोदीजी, हमारी बच्चों की व्हॅक्सीन विदेश क्यों भेजी असे वाक्य असलेले टीशर्ट घालून उभे राहणार आहेत.