मुक्तपीठ टीम
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सातत्याने बंदी घातली जात आहे. याआधी मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरने ट्रम्प यांच्यावर बंदी घातली होती. परंतु आता फेसबुक आणि युट्यूबही ट्रम्पच्या कंन्टेटविरूद्ध कारवाई करीत आहेत. काही दिवसांपूर्वीच फेसबुक, स्नॅपचॅट आणि ट्विटरने ट्रम्पचे व्हिडिओ, पोस्ट आणि अकाउंटवर बंदी घातली होती आणि आता युट्यूबने डोनाल्ड ट्रम्प यांनी अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओही त्यांच्या प्लॅटफॉमवरून काढून टाकला आहे.
चिथावणीखोर वक्तव्य केल्यामुळे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. युट्यूबने ट्रम्प यांच्यावर सात दिवसांसाठी बंदी घातली आहे. त्यामुळे ट्रम्प यांना सात दिवस युट्यूबवर एकही व्हिडीओ अपलोड करता येणार नाही. केवळ ट्रम्प यांना सात दिवस बंदी घालून युट्यूब थांबलेलं नाही तर ट्रम्प यांचा एक व्हिडीओ युट्यूबवरून काढून टाकण्यात आला आहे. हिंसेच्याविरोधातील त्यांनी आमच्या धोरणांचं उल्लंघन केलं आहे, असं युट्यूबने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ट्रम्प यांना सात दिवस युट्यूबवर कोणतेही व्हिडीओ अपलोड करता येणार नाही. त्याआधी फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामनेही ट्रम्प यांचं अकाऊंट सस्पेंड केलं होतं.
जो बायडन यांचा शपथविधी येत्या २० जानेवारी रोजी होणार आहे. म्हणजे हा शपथविधी सोहळा पार पडेपर्यंत ट्रम्प यांच्यावर युट्यूबची बंदी असणार आहे. शपथविधी सोहळ्यादरम्यान काहीही गडबड होऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं.