मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभर अभूतपूर्व संकट निर्माण केले आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्याला सामोरे जावं लागत असल्यानं ऑक्सिजन पुरवठ्यासाठी वेगवेगळे नाविन्यपूर्ण मार्ग शोधले जात आहेत. जम्मू काश्मिरातील बांडीपोराच्या मोहम्मद इस्माईल मीर यांनी घरीच तयार केलेला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर तज्ज्ञांच्याही प्रशंसेस पात्र ठरला आहे. हे होम मेड ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर स्वस्त, टिकाऊ असल्याचा विश्वास मोहम्मद इस्माइल मीर यांनी व्यक्त केला आहे.
मोहम्मद इस्माईल मीर यांच्या मते, हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर एखाद्या कंपनीने मोठ्या प्रमाणात तयार केले तर ते सात किंवा आठ हजार रुपयांमध्ये उपलब्ध होऊ शकतील. सध्या बाजारात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर जवळपास ४० हजार रुपयांनी मिळत आहे.
कोण आहेत मोहम्मद इस्माईल मीर?
• उत्तर काश्मिरातील दहशतवाद्यांचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बांडीपोरात ते राहतात.
• हा भाग खूपच मागासलेला मानला जातो.
• पण मोहम्मद मीर यांना तांत्रिक कामांची खूप आवड आहे.
• ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर हा मोहम्मद यांचा पहिला शोध नाही.
• गेल्या वर्षी पहिल्या लाटेत त्यांनी व्हेंटिलेटरचा एका नमुना तयार केला होता.
• ते नेहमीच स्वत:च्या वर्कशॉपलाच स्वत:चे घर मानतात.
• कोणतंही यंत्र पाहिलं तर ते पाहून त्यात अधिक सुधारणा कशा घडवता येतील यावर त्यांचा विचार सुरु होतो.
मोहम्मद मीर यांचे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आहे कसं?
• ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बनवण्यासाठी वापरण्यात आलेले सामान हे सहजरीत्या बाजारात मिळेल असे आहे.
• यात वापरण्यात आलेला जियोलाइट गेल्या वर्षी खरेदी केला आहे.
• तसेच हा कॉन्सन्ट्रेटर कोणत्याही रुग्णाला देण्यात आलेल्या ऑक्सिजनची गती नियंत्रित करु शकतो.
• ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बनवण्याची कल्पना ऑक्सिजन सिलिंडर आणि कॉन्सन्ट्रेटर तुटडवड्याच्या बातम्यांमधून आली.
• आता वॉटर बेस्ड कॉन्सन्ट्रेटर तयार करण्याचे ध्येय आहे. याचा उपयोग पाण्यातील ऑक्सिजन शोषून घेण्यासाठी होऊ शकतो.
पाहा व्हिडीओ: