मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेकांचे रोजगार हिरावले गेलेत. अनेकांच्या दोन वेळच्या जेवणासाठी त्रास होत आहे. त्यातही मुंबईतील रुग्णालयांमध्ये आपल्या रुग्णांसोबत आलेल्यांना तर दोन वेळच्या जेवणाची खूपच गैरसोय होते. अशांसाठी सी.ए.सी.आर. व रोटी बँक डबेवाला यांनी मुंबईतील के.ई.एम. रूग्णालयाबाहेर जेवणाची मोफत सोय केली आहे.
असं म्हणतात की भूक लागली तेवढंच जेवतो त्याला प्रकृती म्हणतात, भूक लागली त्यापेक्षा जास्त जेवतो त्याला विकृती म्हणतात. आणि भुकेल्याला आपल्याआधी जेवायला घालून मग स्वत: जेवणं याला संस्कृती म्हणतात. ही संस्कृती जपण्याचे काम रोटी बँकेच्या माध्यमातून केले जात आहे, असे रोटी बँकेचे संस्थापक सुभाष तळेकर यांनी सांगितले.
रोटी बँकेच्या या उपक्रमामुळे रुग्णालयांमध्ये येणाऱ्या गरजूंची मोठी सोय झाली आहे. आवश्यक ते पौष्टिक अन्न त्यांना पॅक केलेले असे मिळते. त्यामुळे तेही या रोटी बँकेला आणि सी.ए.सी.आर. या संस्थांना तृप्त अंतकरणाने धन्यवादच देतात.
पाहा व्हिडीओ: