मुक्तपीठ टीम
ऑईल इंडियामध्ये ड्रिलिंग हेडमॅन या पदासाठी ४ जागा, ड्रिलिंग रिगमॅन या पदासाठी ५ जागा, विद्युत पर्यवेक्षक या पदासाठी ५ जागा, रासायनिक सहाय्यक या पदासाठी १० जागा, सहाय्यक रिग इलेक्ट्रिशिअन या पदासाठी १० जागा, ड्रिलिंग टॉपमॅन या पदासाठी १७ जागा, सहाय्यक मेकॅनिक या पदासाठी ४८ जागा, गॅस लॉगर या पदासाठी २० जागा, सहाय्यक मेकॅनिक-आयसीइ या पदासाठी ३१ जागा अशा एकूण ११९ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २२ जून २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात. या पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाकडून दहावी उत्तीर्ण असावेत. याशिवाय मान्यताप्राप्त पॉलिटेक्निकमधील इंजिनीअरिंग डिप्लोमा धारकदेखील या पदांसाठी अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ४० वर्षांपर्यंत असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी अधिकृत सूचना पाहा-
https://www.oil-india.com/Document/Career/Online_Advertisement_5May2021.pdf?ref=inbound_article
अधिक माहितीसाठी
ऑईल इंडियाच्या अधिकृत वेबसाइट https://www.oil-india.com/ वरून माहिती मिळवू शकता.
पाहा व्हिडीओ: