मुक्तपीठ टीम
कोरोना साथीच्या काळात मुंबई मनपा कोरोनाच्या विरोधात देत असलेल्या लढ्याचं देशात सर्वत्र कौतुक केलं जात आहे. मुंबई मनपाने ज्या प्रकारे गरजू रूग्णांना ऑक्सिजन पुरविला त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानेही कौतुक केले आहे. सर्वच कौतुक करतात ते कोरोना नियंत्रणाचं मुंबई मॉडेल समजवून घेण्याचा हा प्रयत्न:
नेतृत्व, धोरण आणि अंमलबजावणी
• मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: लक्ष ठेवलं.
• पालकमंत्री आदित्य ठाकरे, अस्लम शेख यांनी देखरेख करत राज्य सरकारकडून सर्व सहकार्य केलं.
• महापौर किशोरी पेडणेकर आणि मुंबई मनपाचे आयुक्त इक्बालसिंग चहल आणि त्यांच्या टीमने चांगला समन्वय, संवाद राखत आतापर्यंत खूपच चांगलं करुन दाखवलं.
• मुंबई मनपाने सूक्ष्म नियोजन, समन्वय आणि चांगल्या व्यवस्थापनामुळे कोरोनाशी लढत देत आहे.
• मुंबईतील नागरिकांनीही चांगली साथ दिली, त्यामुळे कोरोना संसर्ग खूपच मंदावला आहे.
स्थानिक आमदार @AUThackeray ji
यांच्या सूचनेनुसार प्रभाग 199 मध्ये महापौर @KishoriPednekar यांनी सर्व नागरिकांना लसीकरण केंद्र उपलब्ध होण्यासापेक्ष @mybmcWardGS अधिकारी वृंद यांच्यासह नाम जोशी मार्गावरील अपोलो मिल येथे MyBmc सार्वजनिक वाहनतळाची पाहणी केली. pic.twitter.com/LocgIpxbzw— Kishori Pednekar (@KishoriPednekar) May 7, 2021
मुंबईनं ऑक्सिजन आवश्यकतेचं नियोजन कसं केलं?
• कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी मुंबई मनपाला भविष्यातील संभाव्य धोका आणि त्याला तोंड देण्यासाठी भासणारी गरज लक्षात आली.
• कोरोना बाधितांना ऑक्सिजनची खूप गरज भासेल हे माहित होते, म्हणून सर्व मोठ्या कोरोना सेंटर्ससाठी ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी आधीच व्यवस्था केली गेली होती.
• रुग्णालयातच मोठ्या क्षमतेच्या ऑक्सिजन टाक्या तयार केल्या गेल्या.
• ऑक्सिजन बेड असलेल्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवठ्यासाठी २४ विभागांपैकी ६ समन्वय अधिकारी नियुक्त केले आहेत.
• केंद्र, राज्य सरकार आणि ऑक्सिजन पुरवठा कंपन्यांशी संपर्क साधला.
• प्रत्येक गरजू व्यक्तीला ऑक्सिजन पुरविला.
• पहिल्या लाटेनंतर, मुंबई मनपाच्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवठा खंडित होऊ नये यासाठी पीएसए तंत्रज्ञानावर आधारित ऑक्सिजन प्लांट कस्तुरबा आणि हिंदूह्रद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयांमध्ये स्थापित करण्यात आले.
• इतर १२ ठिकाणी ४५ मेट्रिक टन पीएसए तंत्रज्ञानाचे ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
• मुंबईला दररोज विविध कंपन्यांकडून २३५ मेट्रिक टन ऑक्सिजन मिळत आहे.
• ऑक्सिजन वितरणासाठीच्या विशेष टीमने उत्पादन साइटवरून रुग्णालयात ऑक्सिजन पोहचेपर्यंत देखरेख केली.
• एक टीम तयार केली आणि गूगल ड्राइव्हवर दररोज मुंबईला किती ऑक्सिजन मिळत आहे याची माहिती अपडेट केली.
• यामुळे मुंबई दररोज किती ऑक्सिजन मिळतो यावर लक्ष ठेवण्यास मदत झाली.
आज सकाळी वरळी कोळीवाडा येथे नगरसेविका @WorlikarHemangi जी यांच्या प्रयत्नातून सुरू झालेल्या लसीकरण केंद्राचे उदघाटन केले. या केंद्रात दररोज ३०० ते ४०० लोकांचे लसीकरण केले जाईल. pic.twitter.com/SQPM1BUFAN
— Aaditya Thackeray (@AUThackeray) April 22, 2021
दररोज १० लाखपैकी ४ लाख लोकांची रोजची चाचणी
• ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत, निवडलेल्या विभागांमध्ये घरोघरी जाऊन तापमान, ऑक्सिजन पातळी मोजली जात आहे.
• ‘चेस व्हायरस’ मोहिमेमध्ये ४ टी फॉर्म्युला देखील लागू केला गेला. ३१,६९५ बेड, १२,७५४ ऑक्सिजन बेड आणि २,९२९ आयसीयू बेड तयार केले. दररोज १० लाखांपैकी ३,९८,४४५ चाचण्या होतात.
मुंबईत सुविधा, स्वच्छता, रेशनची व्यवस्था
• २४ वॉर रूम सज्ज केले. तेथे १० रुग्णवाहिका आणि ५० मोबाइल व्हॅन रुग्णालय तैनात करण्यात आले.
• झोपडपट्टीतील सार्वजनिक स्वच्छतागृहे दिवसातून अनेक वेळा स्वच्छ केली जातात.
• मास्क न लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करतात.
• संसर्ग जास्त असलेल्या विभागांमधील घराला रेशन देण्याची जबाबदारी प्रशासनाने घेतली, यामुळे संसर्ग रोखला गेला.
तीन सीरो सर्वेक्षणांचा फायदा
• मुंबई मनपाचा सीरो सर्वेक्षण करण्याचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध झाले.
• त्यावरून हे दिसून आले की शहरातील किती टक्के लोकांच्या शरीरात अॅंटिबॉडीज तयार आहेत.
• कॅन्टोनमेंट झोनमधील पोलिसांच्या मदतीने सर्व आवश्यक वस्तू वाहतूक केली गेली जेणेकरून संसर्ग पसरू नये.
The second phase of #NESCO #JumboCovidCenter will start on Wednesday with an added capacity of 1500 beds, of these 1000 beds will have #oxygen facility. .
In the beginning 500 #Beds will be available, in which 300 beds will hv O2 facility. #Mumbai #COVID19India #Corona2ndWave pic.twitter.com/ZTCnNpDYIU
— Aslam Shaikh, INC (@AslamShaikh_MLA) April 27, 2021