मुक्तपीठ टीम
देशात उद्यापासून म्हणजेच १ मेपासून कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु होणे आवश्यक असतानाच लसींची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे महाराष्ट्र, मध्यप्रदेशासह अनेक राज्यांमध्ये लसीकरणावर परिणाम झाला आहे. मुंबईत तीन दिवसांसाठी लसीकरण स्थगित करावे लागले आहे. तर त्याचवेळी केंद्रीय आरोग्य खात्याने देशभरातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे कोरोनाचे एक कोटींपेक्षा जास्त डोस उपलब्ध आहेत, असा दावा केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रायलाच्या दाव्यानुसार महाराष्ट्रातही लसीकरणासाठी ७,४९,९६० डोस उपलब्ध आहे. त्याचवेळी काँग्रेसचे ज्येषअठ नेते पी. चिदंबरम यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना आव्हान दिलं आहे, “जर लसींचा साठा राज्यांकडे आहे, तर मग एक मेपासून लसीकरण झाले नाही, लोकांना परत पाठवले गेले तर आरोग्य मत्री हर्षवर्धन राजीनामा देणार का?”
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा दावा
• महाराष्ट्रात २९ एप्रिल रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत लसींचे १,६३,६२,४७० डोस दिले गेले आहेत.
• राज्यात आता लसींचे ७,४९,९६० डोस उपलब्ध आहेत.
• भारत सरकारने राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत १६.१६ डोस पुरवले आहेत.
• राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे लसींचे एक कोटी पेक्षा जास्त डोस उपलब्ध आहेत.
• येत्या तीन दिवसांत २० लाख पेक्षा जास्त डोस राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना उपलब्ध करुन देण्यात येतील.
• कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा १ मेपासून सुरू होईल.
🔸GoI has so far provided 16.16 cr #COVID19Vaccine doses to States/UTs for free
🔹1cr+ doses still available in stock with States & UTs
🔸More than 20L doses to be delivered to them within 3 days@PMOIndia @MoHFW_INDIA
#Unite2FightCorona #IndiaFightsCorona pic.twitter.com/8a0BnJBnPs— Dr Harsh Vardhan (@drharshvardhan) April 29, 2021
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांचा केंद्रावर निशाणा
• पी. चिदंबरम ट्विट करत केंद्राला लक्ष्य केले आहे.
• एक मेपासून केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची परीक्षा असेल.
• त्यांचा आणि त्यांच्या सरकारचा दावा आहे की राज्यांकडे लसींचा आवश्यक प्रमाणात साठा आहे.
• त्यांचा हा दावा हवेत उडून जाईल.
• देशातले कोणतेही राज्य हे उद्यापासून सुरू होणाऱ्या १८ ते ४४ वर्षामधील लोकसंख्येचे लसीकरण सुरू करण्यास तयार नाही.
• सरकारचे कोविन अॅपही मदत करू शकत नाही.
• जर लसी नसल्याने लोक १ मे पासून लसीकरण केंद्रावरून परत पाठवले गेले तर केंद्रीय आरोग्यमंत्री राजीनामा देणार का?
कोई भी राज्य 18-44 वर्ष की आबादी के लिए टीकाकरण शुरू करने के लिए तैयार नहीं लग रहे हैं। यहां तक कि CoWin ऐप भी सहयोग नहीं कर रहा है!
यदि टीके के अभाव के आधार पर लोगों को 1 मई के बाद टीकाकरण केंद्रों से हटा दिया जाता है, तो क्या स्वास्थ्य मंत्री इस्तीफा देंगे?
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) April 29, 2021