मुक्तपीठ टीम
बँक कर्मचारी हे कोरोना संकटातही कार्यरत आहेत. त्यांनाही फ्रंटलाइन वर्कर्स मानले पाहिजे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या प्रवास सुविधा त्यांनाही मिळाल्या पाहिजेत. सर्वात महत्वाचं म्हणजे बँक कर्मचाऱ्यांना फ्रंटलाइन वर्कर्स मानून लसीकरणात प्राधान्य दिले जावे, अशा महत्वपूर्ण मागण्या देशातील मोठ्या बँकांकडून सरकारकडे करण्यात येत आहेत. जर लसीकरण झालं नाही. बँक सेवा अपयशी ठरल्या तर आर्थिक संकट ओढवण्याची इशाराही आयसीआयसीआय बँकेचे कार्यकारी संचालक अनुप बागची यांनी दिला आहे. एकप्रकारे बँकर्सनी सरकारसाठी जारी केलेला हा अलर्ट असल्याचे मानले जात आहे.
बँकर्सचा आर्थिक संकटाचा अलर्ट!
• जर बँक सेवा अपयशी ठरल्या तर त्याचा आर्थिक व्यवहारांवर नकारात्मक परिणाम होईल. त्यामुळे किमान बँक शाखांमध्ये काम करणाऱ्या कर्मचार्यांना कोरोनाची लस घेण्याची परवानगी देण्यात यावी.
• बँका आवश्यक सेवा पुरवतात.
• बँक कर्मचारी सर्व ग्राहकांसमोर व्यवहार करतो आणि त्यांच्या संपर्कात येत असतात. आमच्याकडे आधुनिक सुविधा नाहीत पण आम्हाला लस प्राधान्याने घेण्याची परवानगी नाही.
• बँका कर्मचाऱ्यांना ट्रेन, बस या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या वापराचीही सुविधा नाही, मग आम्ही कोणत्या प्रकारच्या अत्यावश्यक सेवेमध्ये येतो?
• बँकिंग कामकाजावर परिणाम झाला तर सध्याच्या आरोग्याच्या संकटाबरोबरच आपल्यासमोर आर्थिक संकट उद्भवू शकते.
• त्यांनी आपला मुद्दा स्पष्ट करण्यासाठी सात दिवसांपासून बंद असलेल्या एका एटीएमचा उल्लेख केला.