मुक्तपीठ टीम
जीवाची किंमत कशातही करता येत नाही. जीव धोक्यात घालून दाखवलेले शौर्याचा कितीही प्रशसां केली तरी कमीच. मात्र, अशा शौर्याचा गौरव करणं म्हणजे इतरांना प्रेरणा देणे, त्यामुळेच जावाने मुंबईचा शक्तिमान मयूर शेळकेचा एक शानदार मोटरसायकल देऊन सन्मान केला आहे. हा मयूर शेळके तोच तरुण आहे ज्याने काही दिवसांपूर्वी आपला जीव धोक्यात टाकून रेल्वे रुळावर पडलेल्या लहानग्याचा जीव वाचवला होता. मयूरच्या शौर्याबद्दल देशातील विविध स्तरावरुन त्यांचे कौतुक केले गेले. तसेच रेल्वेनेही त्याला ५० हजार रुपयांचा पुरस्कार दिला होता.
मयूर – मुंबईचा अस्सल शक्तिमान!
• एक दृष्टीहीन दिव्यांग महिला रेल्वे स्थानकातून जात असताना तिचा मुलगा रुळावर पडला.
• समोरून एक्स्प्रेस भरवेगाने येत असल्याने कुणीच पुढे सरसावत नव्हते.
• मयूर शेळकेने ते पाहताच रुळातून मुलाकडे धाव घेतली.
• मुलाला फलाटावर ठेवत मग त्याने फलाटावर झेप घेतली, तेव्हा एक्स्प्रेस फक्त काही फुटांवर पोहचली होती.
• रेल्वे स्थानकावर घटलेल्या त्या थरारक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.
• लाखोंनी मयूरच्या शौर्याचे कौतुक केले.
• याच दरम्यान, लहानग्याचे जीव वाचवल्यानंतर रेल्वेने बक्षीस रुपात देलेल्या ५० हजारांतील अर्धी रक्कम त्यांनी त्याच लहानण्याला देण्याचे ठरविले आहे.
मयूर शेळकेला दिलेल्या ‘जावा’ मोटारसायकलचे वैशिष्ट्य
• मयूर शेळकेला दिलेल्या मोटारसायकलचे नाव ‘जावा ४२’ असे आहे.
• तसेच कंपनीने असा दावा केला आहे की, या मोटारसायकलमध्ये क्रॉस पोर्ट टेक्नोलॉजी वापरणारे पहिले सिंगल सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे.
• २०२१च्या जावा ४२ या मोटरसायकलचे वजन १७२ किलोग्राम आहे.
• कंपनीने या मोटारसायकलला वेगळ्या डिझाईनमध्ये सादर केले आहे.
• ती ओरियन रेड, सीरियस व्हाइट आणि ऑलस्टार ब्लॅक या तीन रंगात विक्रीसाठी उपलब्ध आहे.