मुक्तपीठ टीम
भारतातील कोरोना एकत्रित चाचण्यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ दिसून आली आहे. गेल्या आठवड्यात भारताने एकूण १८ कोटी चाचण्यांचा टप्पा ओलांडला आहे. आता भारतात १८,०२,५३,३१५ चाचण्या झाल्या आहेत.
केंद्र सरकारनं जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, देशभरात प्रगतीपथावर असलेल्या चाण्यांच्या पायाभूत विस्तारामुळे देशातील चाचण्यांचा आलेख उंचावण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. १२०१ शासकीय वैद्यकीय प्रयोगशाळा आणि ११५ खासगी प्रयोगशाळा अशा एकूण २३१६ प्रयोगशाळांमुळे दैनंदिन चाचणी क्षमतेत भरघोस वाढ झाली आहे.
सर्वसमावेशक व्यापक चाचण्या केल्यामुळे देखील राष्ट्रीय पातळीवरील कोरोना बाधितांचा दर खाली आणण्यास मदत झाली आहे. एकूण चाचण्यांचा 18 कोटींचा टप्पा ओलांडल्यामुळे एकूण चाचणी दरात घट होत आहे. कोरोना बाधितांचा एकूण राष्ट्रीय दर आज ५.७९ % इतका आहे. तो पाच महिन्यांच्या काळात ८.९३ % वरून ५.७९ % इतका खाली आला आहे.
१५ राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना बाधितांचा दर हा राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे. बिहारमध्ये कोरोना बाधितांचा दर १.४४ % आहे. भारतात प्रति दशलक्ष (टीपीएम) चाचण्यांमागे आज १३०६१८.३ चाचण्या होत आहे. चाचण्यांच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ झाल्यामुळे टीपीएमध्ये देखील अभूतपूर्व वाढ झाली आहे.
२२ राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रति दशलक्ष नुसार राष्ट्रीय सरासरी पेक्षा चाचण्यांचे प्रमाण बऱ्याच अंशी चांगले आहे. १३ राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रति दशलक्ष प्रमाणे राष्ट्रीय आकडेवारीच्या तुलनेत चाचण्यांचे प्रमाण कमी आहे आणि या भागांमध्ये चाचण्यांचे प्रमाण उच्च पातळीवर वाढविणे गरजेचे असल्याचे दिसते.