मुक्तपीठ टीम
लस टंचाईच्या बातम्या येत असतानाच महाराष्ट्राने एक कोटी तर देशाने दहा कोटी लसीकरणाचा टप्पा पार केल्याची चांगली बातमी आली आहे. महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली असतानाच कोरोनाविरुद्धचा लढा अधिक तीव्र होत आहे. देशात महाराष्ट्र लसीकरणात पहिल्या क्रमांकावर आहे. राज्याने लसीकरणात विक्रम केला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात सुमारे १ कोटीहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. त्याचवेळी देशानेही अशीच विक्रमी कामगिरी बजावली आहे. नागरिकांना लसीचे १० कोटी डोस देत कोरोना रोखण्याच्या लढ्यात भारताने अजून एक मैलाचा दगड गाठला आहे.
लसीकरणाची व्याप्ती 45 वर्षे त्यापुढील वयाच्या लोकांसाठी वाढवत त्याशिवाय या वयोगटासाठी सरकारी व खासगी कामाच्या जागी लसीकरणाची सोय करुन देण्यास मुभा असे अनेक महत्वाचे निर्णय, सहयोग व समन्वयाच्या भूमिकेतून केंद्र व राज्यांनी कोरोनाच्या विळख्यातून मोलाचे जीव वाचावेत म्हणून घेतले. परिणामकारक औषधोपचार व्यवस्थापनामुळे भारताचा मृत्यूदर जगात सर्वात कमी म्हणजे १.२८% राहिला.
लसीकरणात भारत हा जगातील सर्वात वेगवान देश आहे. १०० कोटी डोस देण्यासाठी अमेरिकेने ८९ दिवस तर चीनने १०३ दिवस घेतले होते. भारताने ही त्यांच्यापेक्षा कमी दिवसात हे लक्ष्य गाठले. ८५ दिवसात मिळवलेल्या या यशाची इतर देशांशी तुलना करताना भारताचा प्रतिदिन लसीकरणाचा वेग सर्वाधिक आहे हे महत्वाचे. अमेरिकेने ८५ दिवसांमध्ये ९२.०९ दशलक्ष मात्रा तर चीनने ८५ दिवसात ६१.४२ दशलक्ष मात्रा दिल्या.
एकूण १५,१७,२६० सत्रात देण्यात आलेल्या १०.१२ कोटी मात्रांमध्ये लसीची पहिली मात्रा घेणाऱ्या ९०,०३,०६० आरोग्यकर्मचाऱ्यांचा आणि लसीची दुसरी मात्रा घेणाऱ्या ५५,०६,७१७ आरोग्य कर्मचाऱ्यांचा तसेच लसीची पहिली मात्रा घेणाऱ्या आघाडीवर काम करणाऱ्या ९९,३९,३२१ कर्मचाऱ्यांचा, लसीची दुसरी मात्रा घेणाऱ्या आघाडीवर काम करणाऱ्या ४७,२८,९६६ कर्मचाऱ्यांचा, लसीची पहिली मात्रा घेणाऱ्या ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील ३,०१,१४,९५७ लाभार्थ्यांचा आणि दुसरी मात्रा घेणाऱ्या ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील ६,३७,७६८ लाभार्थ्यांचा तसेच पहिली मात्रा घेणाऱ्या ६० वर्षावरील वयोगटातील ३,९५,६४,७४१ लाभार्थ्यांचा, दुसरी मात्रा घेणाऱ्या ६० वर्षावरील वयोगटातील १७,८८,७५२ लाभार्थ्यांचा समावेश आहे.
HCWs FLWs Age Group 45-60
years Above 60
Years Total Achievement
1st Dose 2nd Dose 1st Dose 2nd Dose 1st Dose 2nd Dose 1st Dose 2nd Dose 1st Dose 2nd Dose
90,03,060 55,06,717 99,39,321 47,28,966 3,01,14,957 6,37,768 3,95,64,741 17,88,752 8,86,22,079 1,26,62,203
आज देशव्यापी लसीकरणाच्या 85 व्या दिवशी रात्री 8 वाजेपर्यंत लसींच्या 29,65,886 मात्रा देण्यात आल्या. तात्पुरत्या अहवालातील माहितीनुसार यापैकी 26,31,119 लाभार्थ्यांना पहिली मात्रा देण्यात आली तर 3,34,767 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली. याबाबतचा अंतिम अहवाल आज रात्री उशिरा पूर्ण होईल.
Date: 10th April 2021 (85th Day)
HCWs FLWs Age Group 45-60 years Above 60
Years Total Achievement
1st Dose 2nd Dose 1st Dose 2nd Dose 1st Dose 2nd Dose 1st Dose 2nd Dose 1st Dose 2nd Dose
12,581 26,051 66,137 68,029 17,32,688 52,191 8,19,713 1,88,496 26,31,119 3,34,767
पाहा व्हिडीओ: