मुक्तपीठ टीम
कोरोना महामारीमुळे थेट व्यवहारांपेक्षा ऑनलाइन म्हणजेच डिजिटल व्यवहारांकडे माणसं वळलीत. जास्त प्रमाणात डिजिटल व्यवहार सुरु झालेत. त्याचाच परिणाम म्हणून भीम आणि यूपीआयच्या माध्यमातून झालेल्या डिजिटल व्यवहारांचा नवा विक्रम गेल्या महिन्यात घडला आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एनपीसीआयच्या ताज्या आकडेवारीनुसार यावर्षी मार्चमध्ये देशात भिम यूपीआय माध्यमातून २७३ कोटी व्यवहार झाले. मार्च २०२० मधील १२५ कोटी व्यवहारच्या तुलनेत यावर्षी दुप्पट व्यवहार झाले आहेत.
पाच लाख कोटींपेक्षा जास्त व्यवहार
एनपीसीआयच्या आकडेवारीनुसार मार्च २०२१ मध्ये भीम यूपीआयमार्फत ५,०४,८८६ कोटी रुपयांचे व्यवहार झाले. मार्च २०२० मध्ये २,०६,४६२ कोटी रुपयांचे व्यवहार झाले. एका वर्षापूर्वीच्या समान कालावधीच्या तुलनेत यावर्षी भीम यूपीआयच्या माध्यमातुन दुप्पट व्यवहार यावर्षी झाले. फेब्रुवारी २०२१ मध्ये भीमा यूपीआयमार्फत २२९ कोटी व्यवहार झाले होते, ज्यात ४,२५,०६२ कोटी रुपयांचा व्यवहार झाला.
फास्टॅगच्या माध्यमातून १९.३२ कोटी व्यवहार
आकडेवारीनुसार मार्च २०२१ मध्ये आयएमपीएस सोबत रिअल टाइम सेटलमेंटच्या माध्यमातुन ३६.३१ कोटीचे व्यवहार झाले.यामध्ये ३,२७,२३४.४३ कोटीचे व्यवहार झाले.भारत बिलपेच्या मार्फत ३.५२ कोटीचे व्यवहार झाले, ज्यामध्ये ५,१९५,७५ कोटी रुपयांचे व्यवहार झाले. त्याच वेळी फास्टॅगमार्फत १९.३२ कोटीचे व्यवहार झाले, त्यापैकी ३,०८६.३२कोटी व्यवहार झाले.
एनयूईसाठी पाच कॉन्सोर्टियमचे प्रयत्न
एनपीसीआयसारख्या न्यू अम्ब्रेला एंटिटीची स्थापना करण्यासाठी पाच कंसोर्टियमनी भारतीय रिझर्व्ह बँके (आरबीआय)कडे अर्ज केला आहे.या सर्व कंपन्या एनपीसीआयसारखे पेमेंट सिस्टम इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतील. सध्या या विभागात एनपीसीआयची मक्तेदारी आहे. परंतु खासगी कंपन्या आल्यामुळे एनपीसीआयची मक्तेदारी संपेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२१ होती. सध्या एनपीसीआय रुपे, यूपीआय, नॅशनल ऑटोमॅटिक क्लीयरिंग हाऊससह सर्व प्रकारच्या रिटेल पेमेंट सर्व्हिसेससाठी अम्ब्रैला एंटिटी म्हणून काम करते.
या कंसोर्टियमने आवेदन केले
१)अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, ॲमेझॉन, व्हिसा, पाइन लॅब आणि बिलडेस्क.
२)टाटा समूहातील कंपन्या फॅराबाईन, कोटक बँक, एचडीएफसी बँक, एअरटेल डिजिटल, फ्लिपकार्ट, मास्टरकार्ड आणि पेयू.
३)पेटीएम, ओला फायनान्शियल, ईपीएस, इंडसइंड बँक, सेंट्रम फायनान्स आणि झेटा पे.
४)रिलायन्स जिओ, इन्फिबीमची कंपनी सो वी इंडिया
५)इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक आणि रेझर पे.
पाहा व्हिडीओ: