मुक्तपीठ टीम
खादी व ग्रामोद्योग आयोगाने एक वेगळाच प्रकल्प सुरु केला आहे. हा प्रकल्प आहे मधमाशांचा वापर करून हत्तींचे मानवी वस्तीवरील हल्ले कमी करण्याचा आहे. या अभिनव प्रकल्पाची सुरुवात कर्नाटकमधील कोडागू जिल्ह्यातील नगरहोळे नॅशनल पार्कच्या परिघावरील क्षेत्रात झाली आहे. त्यासाठी चार ठिकाणी प्रोजेक्ट आरई-एचएबी सुरु करण्यात आला आहे. कुणालाही इजा न करता हत्ती-मानव संघर्ष रोखण्याचा हा एक अनोखा, स्वस्त-प्रभावी मार्ग आहे. या प्रकल्पांतर्गत मधमाशांच्या पेटींचा उपयोग कुंपण म्हणून हत्तींना मानवी वस्तीत जाण्यापासून रोखण्यासाठी केला जातो. त्यामुळे जीवित आणि वित्त हानी कमी होते. मधमाशा आपल्या डोळ्यांवर आणि सोंडेच्या आतील बाजूस चावा घेतील अशी भीती हत्तींना असते, त्यामुळे ते परतात.
मधमाशींच्या कुंपणाने या ठिकाणी हत्तींचा वावर बर्याच प्रमाणात कमी झाला आहे. या ठिकाणी बसविण्यात आलेल्या नाईट व्हिजन कॅमेऱ्यांनी मधमाशाचे बॉक्स पाहून हत्तींच्या आश्चर्यकारक वर्तनाचे फुटेज हस्तगत केले आहे. त्यात मधमाश्यांच्या भीतीने अनेक हत्ती जंगलात परतताना दिसत आहेत. तसेच, हत्तींच्या मार्गावर मधमाशींच्या पेट्या लावल्यामुळे या भागात हत्तींकडून पिकांचे किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची नोंद नाही.
खादी व ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना म्हणाले की, “इतर राज्यांमध्ये प्रकल्प आरई-एचएबीची अंमलबजावणी केल्यास शेकडो मानव व हत्तींचे जीवन वाचू शकेल. ते म्हणाले की, “केव्हीआयसी हा प्रकल्प अन्य राज्यांमध्येही राबवेल , जिथे जंगली हत्तीच्या भीतीच्या सावटाखाली आदिवासी व ग्रामीण भागातील लोक मोठ्या संख्येने राहत आहेत. प्रोजेक्ट आरई-एचएबीचे अनेक फायदे आहेत.यामुळे मानव-हत्ती संघर्ष कमी होईल, मधमाश्या पालनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, हवामान बदलाकडे लक्ष देता येईल आणि वन संरक्षणास चालना मिळेल.”
पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिसा, छत्तीसगड, आसाम, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हत्ती-मानव संघर्ष होतो. केव्हीआयसी या राज्यात टप्प्याटप्प्याने प्रकल्प आरई-एचएबी कार्यान्वित करण्याचा विचार करत आहे. सन २०१५ पासून देशभरात जंगली हत्तींशी झालेल्या संघर्षात सुमारे २४०० लोक ठार झाले आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून या भागात राहणाऱ्या स्थानिकांना मधमाशी पालनाचे प्रशिक्षण दिले जाईल आणि मधमाशांच्या पेट्या दिल्या जातील, ज्यांचा वापर जंगली हत्तींना दूर ठेवण्यासाठी करता येईल असे सक्सेना म्हणाले.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आणि एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी या नाविन्यपूर्ण प्रकल्पाची प्रशंसा केली आहे . गडकरी म्हणाले की, “कोडागू येथे मानवी क्षेत्रामध्ये हत्तीचा वावर रोखण्यात या प्रकल्पाचे खूपच उत्साहवर्धक परिणाम मिळाले आहेत. ते म्हणाले, प्रकल्प आरई-एचएबीमध्ये प्रचंड क्षमता आहे आणि लवकरच पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिसा, छत्तीसगड, आसाम, तामिळनाडू आणि केरळसारख्या ठिकाणी होणाऱ्या हत्तींच्या हल्ल्यामुळे प्रभावित राज्यांमध्ये त्याची अंमलबजावणी केली जाईल. देशभरातील प्रकल्प प्रभावीपणे राबवण्यासाठी कृषी आणि पर्यावरण व वन मंत्रालयांच्या सहभागावरही त्यांनी भर दिला आहे.
खादी व ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना यांच्या प्रयत्नांमधून हा प्रकल्प सुरु झाला आहे.
पायलट प्रकल्पातील चार ठिकाणी हत्तींच्या हालचालींचा क्रम:
• ०१.०३.२१ ते ०९.०३.२१ – हत्तींची दैनंदिन हालचाल परंतु मानवी भागात प्रवेश करत नाही
• १०.०३.२० ते १५.०३.२१ – हत्तींची हालचाल नाही
• १६.०३.२१ – हत्तींची हालचाल आढळली परंतु, मानवी क्षेत्रात प्रवेश करीत नाही
• १७.०३.२१ ते २५.०३.२१ – हत्तींची हालचाल आढळली नाही
• २६.०३.२१ – हत्ती हालचाल आढळली. मधमाशी बॉक्स लक्षात घेत हत्ती पटकन परत येतो
• २७.०३.२१ ते २९.०३.२१ – हत्तींची हालचाल नाही
• ३०.०३.२१ – हत्तींची हालचाल आढळली. हत्ती मधमाशांची उपस्थिती जाणवते आणि पटकन परततो
पाहा व्हिडीओ: