मुक्तपीठ टीम
तुम्ही १० किंवा १२ वी उत्तीर्ण आहात आणि नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे.पश्चिम मध्य रेल्वेने अॅप्रेंटीसशिप पदांवर भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. याअंतर्गत एकूण ६८० अॅप्रेटीसशिप पदांवर नियुक्ती केली जाईल. डब्ल्यूसीआरच्या जारी केलेल्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून इलेक्ट्रीशियन, फिटर, वायरमॅन, वेल्डर, कंप्यूटर ऑपरेटर, एसी मॅकेनिक, स्टेनोग्राफर या पदांवर भरती केली जाईल. या पदांवरील भरती प्रक्रिया २३ मार्च २०२१ पासून सुरु केली जाईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ एप्रिल २०२१ आहे. यासोबतच जो या पदासाठी अर्ज करणार आहे त्याने आधिकाधिक नोटिफिकेशन वाचणं गरजेचं आहे. या भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी mponline.gov.in या वेबसाईट वर सर्व माहिती उपलब्ध आहे.
या तारखा विसरू नका
१)अप्रेंटीसशीप पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख – २३ मार्च २०२१
२)अप्रेंटीशीप पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ मार्च २०२१
पश्चिम मध्य रेल्वे भरती २०२१
एससी -१०३
एसटी -५३
ओबीसी – १८४
ईडब्लूएस-६९
यूआर- २७१
अॅप्रेटीसशिप पदासाठी अर्ज करणारा उमेदवार १० किंवा १२ वीच्या परीक्षेत ५० टक्क्यांनी उत्तीर्ण असायला हवा. याव्यतिरिक्त उमेदवार एनसीव्हीटी किंवा एससीव्हीटी मान्यता प्राप्त फिटर ट्रेडमध्ये आयटीआयचे प्रमाणपत्र असले पाहिजे. या व्यतिरिक्त अर्जदारांची वयोमर्यादा १ ते २ वर्ष असावी.