मुक्तपीठ टीम
भारतीय नागरिकांसाठी पॅनकार्ड व आधारकार्ड ही दोन ओळखपत्र अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यांची आवश्यकता आपल्याला अनेक ठिकाणी असते. बँकेचे खाते खोलणे असू दे किंवा कुठलाही सरकारी योजनेचा लाभ घेणे असू दे आधारकार्ड पॅनकार्डसोबत लिंक करणे आवश्यक असते. आणि हे आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक करण्यासाठी ३१ मार्च २०२१ शेवटची तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे ३० तारखेच्या अगोदर आधार कार्ड पॅनकार्ड लिंक करून घ्या. जर आधार कार्ड ३० तारखेच्या अगोदर पॅनकार्डसोबत लिंक केलेले नसेल तर पॅनकार्ड रद्द केले जाईल.
पण तुम्ही घाबरू नका, आम्ही तुम्हाला दाखवतो आहोत घर बसल्या आधारकार्ड पॅनकार्डशी कसे लिंक करता येईल.
पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याच्या स्टेप
- पहिले आपले अकाउंट रजिस्टर करणे गरजेचे आहे त्यामुळे आपले अकाऊंट नसेल तर बनवून रजिस्टर करा.
- त्यानंतर आयकर विभागाच्या www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाइटवर जा.
- लिंक वर गेल्यानंतर डाव्या बाजूला लिंक आधार हा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा. यानंतर तुमच्या समोर एक विंडो ओपन होईल.
- विंडो ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमचा पॅन नंबर, आधार नंबर आणि आधारकार्ड वरील नाव त्यात टाईप करायचे आहे.
- जन्मतारखेसारखी महत्त्वाची माहिती भरल्यानंतर प्रोफाइल सेटिंगमध्ये जाऊन आधार लिंक ऑप्शनवर क्लिक करा.
- यामध्ये दिलेल्या सेक्शनमध्ये आपला आधार नंबर आणि कॅपचा कोड टाईप करा. इथे नेत्रहीन लोकांच्या सुविधेसाठी वन टाइम पासवर्ड (ओपीटी) चा ही ऑप्शन आहे. तुम्ही तुमच्या सुविधानुसार कॅपच्या कोड किंवा ओटीपी यापैकी एक पर्याय निवडा.
- या सर्व प्रक्रियेनंतर खाली दिलेल्या लिंक आधार या ऑप्शन वर क्लिक करा त्यानंतर आपल्या आधार लिंक केले जाईल.
या पर्यायावर आपल्या लिंक प्रोसेसचे अपडेट पहा
लिंकिंग प्रोसेसच्या माहितीसाठी सगळ्यात पहिले तुम्हाला आयकर विभागाची वेबसाईट www.incometaxindiaefiling.gov.in यावर जावे लागेल. त्यानंतर वेबसाइटच्या डाव्याबाजूला असलेल्या लिंक आधार या ऑप्शन वर क्लिक करा. आपल्या स्टेटस च्या माहितीसाठी समोर दिलेल्या क्लिक हियर या ऑप्शन वर क्लिक करा. नव्या विंडो वर पॅन कार्ड आणि आधार कार्डची माहिती भारताच आपला स्टेटस पाहू शकता.
भरावा लागेल दहा १०,००० रू. दंड
आयकर विभागाच्या माहितीनुसार 31 मार्च पर्यंत तुम्ही आपले आधारकार्ड पॅनकार्ड सोबत लिंक केले नसेल तर तर तुमचे पॅन कार्ड रद्द केले जाईल. नंतर तुम्ही आपले कॅन्सल केलेल्या पॅन कार्डचा उपयोग करत असाल तर इन्कम टॅक्स सेक्शन २७२ बी नुसारच्या १०,०००रू. दंड भरावा लागेल. यासोबतच बँकिंग ट्रांजेक्शन प्रॉपर्टी खरेदी यासारखी आवश्यक कामे तुम्ही करू शकणार नाही.