Saturday, May 17, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

देशातील राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेतून महराष्ट्रातील ५ नद्यांचा कायाकल्प होणार!

August 1, 2022
in featured, चांगल्या बातम्या, निसर्ग
0
Rivers OF Maharashtra

मुक्तपीठ टीम

नद्यांना प्रदूषण मुक्त करण्यासाठी देशात राष्ट्रीय नदी संवर्धन योजना म्हणजेट एनआरसीपी योजना आहे. लहान नगरे आणि शहरे यांच्या परिसरातील नद्यांच्या प्रदूषित टप्प्यांतील प्रदूषण कमी करण्यासाठी या योजनेद्वारे प्रयत्न केले जातात. त्यासाठी देशभरातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून वेळोवेळी प्रस्ताव येत असतात. प्राधान्यक्रमानुसार त्यांना या योजना व कार्यक्रमांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, निधीच्या उपलब्धतेनुसार मंजुरी देण्यात येते. एनआरसीपीयोजनेतून आतापर्यंत देशातील १६ राज्यांमधील ७८ लहान नगरांमध्ये ३५ नद्यांच्या प्रदूषित भागाबाबत ६,१४२ कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.  तसेच प्रतिदिन २,७४५.७० दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता असलेले प्रकल्प सुरु करण्यात आले आहेत. या राज्यांमध्ये महाराष्ट्रही आहे. महाराष्ट्रातील गोदावरी, कृष्णा, पंचगंगा, तापी, मुळा मुठा या पाच नद्यांचा समावेश आहे. त्यासाठी एक हजार १८२ कोटींची तरतुद करण्यात आली आहे, त्यातील २१४ कोटी महाराष्ट्र राज्य सरकारचे आहेत.

देशातील नद्यांची स्वच्छता आणि कायाकल्प ही सतत सुरु असणारी प्रक्रिया आहे. स्वतःच्या क्षेत्रातील नद्यांच्या पाण्याची स्वच्छता राखली जाईल हे सुनिश्चित करणे ही खरेतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनांची जबाबदारी आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांनी त्यांच्या न्यायकक्षेत निर्माण होणारे घरगुती आणि औद्योगिक सांडपाणी नद्यांमध्ये अथवा इतर जलसाठ्यांमध्ये, समुदात अथवा जमिनींवर विसर्जित करण्याआधी त्यांच्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाला प्रतिबंध करून नियंत्रण ठेवण्यासाठी शहरी स्थानिक संस्था आणि औद्योगिक एकके त्या सांडपाण्यावर विहित नियमानुसार प्रक्रिया करत आहेत याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. नद्यांच्या संवर्धनासाठी, केंद्रीय जलशक्ती मंत्रालय गंगा नदी खोऱ्यासाठी नद्यांसाठी नमामि गंगे ही केंद्र सरकारची योजना आणि देशातील इतर नद्यांसाठी एनआरसीपी अर्थात केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय नदी संवर्धन योजना यांच्या माध्यमातून देशातील नद्यांच्या निश्चित केलेल्या टप्प्यांमधील प्रदूषण कमी करण्यासाठी आर्थिक तसेच तंत्रज्ञानविषयक मदत पुरवून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांच्या प्रयत्नांना हातभार लावत आहे. सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणे हा या कार्यक्रमातील एक महत्त्वाचा घटक आहे.

एनआरसीपी योजनेअंतर्गत विविध प्रदूषण नियंत्रण योजना राबविण्यासाठी केंद्राचा वाटा म्हणून विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना २७९९ कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. एनआरसीपीअंतर्गत १ एप्रिल २०१६ पासून केंद्र आणि राज्ये यांच्याकडून देण्यात येणाऱ्या  निधीचे गुणोत्तर ईशान्येकडील राज्ये आणि डोंगराळ राज्यांसाठी ९०:१० आणि उर्वरित राज्यांसाठी ६०:४० असेल असे निश्चित करण्यात आले आहे.केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातर्फे ८५:१५ या गुणोत्तर प्रमाणात देण्यात आलेल्या निधीच्या वापरातून सध्या महाराष्ट्रातील पुणे येथे मुळा-मुठा नदी संवर्धन कृती योजना राबविण्यात येत आहे.

एनआरसीपी योजना आणि नमामि गंगे कार्यक्रमाअंतर्गत राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशनिहाय  मंजूर निधी आणि झालेला खर्च यांचा तपशील परिशिष्टात दिला आहे

त्याचबरोबर, अमृत अर्थात अटल कायाकल्प आणि शहरी परिवर्तन अभियान तसेच केंद्रीय गृहनिर्माण आणि\ शहरी व्यवहार मंत्रालयाचे स्मार्ट शहरे अभियान यांच्या माध्यमातून सांडपाणीविषयक पायाभूत सुविधा विकसित करण्यात येत आहेत.

केंद्रीय राज्यमंत्री बिश्वेश्वर तुडू यांनी आज लोकसभेत लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली.

ANNEXURE

(a) State/UT wise sanctioned cost and expenditure incurred under NRCP:

(Rs. in crore)

Sl. No. States River Sanctioned Cost Expenditure incurred by State Govt. as on June,2022
1 Andhra Pradesh Godavari 110.21 19.59
2 Goa Mandovi 14.10 13.50
3 Gujarat Sabarmati, Mindhola, Tapi 1779.78 1010.51
4 Jharkhand Subarnrekha 3.14 0.98
5 Jammu and Kashmir Devika and Tawi 186.74 49.00
6 Karnataka Pennar, Bhadra, Tungabhadra,

Cauvery, Tunga

66.25 53.59
7 Kerala Pamba 18.45 33.69
8 Madhya Pradesh Tapti, Wainganga, Narmada 20.16 9.67
9 Maharashtra Krishna, Panchganga, Godavari, Tapi, Mula Mutha 1182.86 214.91
10 Manipur Nambul 97.72 42.22
11 Nagaland Diphu and Dhansiri 78.65 54.42
12 Odisha Brahamini, Mahanadi, Coastel Area 92.74 90.25
13 Punjab Satluj, Beas & Satluj, Ghaggar 774.43 797.41
14 Sikkim Rani Chu, Tista 463.05 225.54
15 Tamil Nadu Cauvery, Adyar, Cooum, Vaigai, Vennar, Tamrabarani 908.13 901.17
16 Telangana Godavari, Musi 345.72 346.83
Total : 6142.12 3863.28

 

(b) State/UT wise sanctioned cost and expenditure incurred under Namami Gange programme

 (Rs. in crore)

Sl.No. States /UT Rivers Covered Sanctioned* cost Expenditure* incurred by state Govt. as on June 2022
1 Uttarakhand Ganga,Rispana ,

Bindal,koshi,Dhela,

Alaknanda.

1686.91 888.00
2 Uttar Pradesh Ganga,Gomti,Saryu,

Ghaghar,kali,Yamuna,

Hindon,Ram ganga.

11564.37 4395.00
3 Bihar Ganga,Gandak,Sone. 6046.58 3080.00
4 Jharkhand Ganga,Damodar 279.24 220.00
5 West Bengal Ganga,Damodar,

Barakar,Adi Ganga.

4117.70 1672.00
6 Delhi Yamuna 2361.03 1340.00
7 Haryana Yamuna 217.87 217.94
8 Himachal Pradesh Yamuna 11.57 3.75
9 Madhya Pradesh Morar, Shivana 68.15 –
10 Rajasthan Chambal 258.48 121.49
Total: 26611.9 11938.18

*The sanctioned cost and expenditure includes sewage infrastructure and ghats & crematoria projects.

 

पाहा व्हिडिओ:


Tags: Godavari RiverMahrashtra riversNRCP SchemePanchganga RiverTapi Riverराष्ट्रीय नदी संवर्धन योजना
Previous Post

हिणवलं जरी ‘कॅनडा कुमार’, तो अक्षयकुमारच सर्वात जास्त कर भरणारा फिल्मस्टार!

Next Post

नासा मंगळावरील नमुने पृथ्वीवर आणणार! मोहिमेत दोन सॅम्पल रिकव्हरी हेलिकॉप्टर्स!!

Next Post
NASA

नासा मंगळावरील नमुने पृथ्वीवर आणणार! मोहिमेत दोन सॅम्पल रिकव्हरी हेलिकॉप्टर्स!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!