मुक्तपीठ टीम
इंग्लंडमधील वैज्ञानिकांनी थ्रीडी प्रिंटिंगद्वारे कृत्रिम कान-नाक तयार केले आहे. या अवयवांचा उपयोग जन्मत: नाक-कान नसणाऱ्या मुलांना आणि प्रौढांनाही करता येतो. हे कृत्रिम अवयव तयार करुन रुग्णाच्या पेशींमधून प्रत्यारोपण करता येते.
या अवयवांना वेल्सच्या स्वानसी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी तयार केले आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, “कान आणि नाका या अवयवांशिवाय चेहऱ्याचे इतर भागही थ्रीडी प्रिंटिंगद्वारे तयार करता येतात. या तंत्राच्या मदतीने चेहऱ्यावरच्या जळलेल्या, कर्करोग आणि इतर जखमांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई केली जाऊ शकते.”
रूग्णाच्या स्टेम पेशींपासून थ्रीडी अवयव
स्वानसी विद्यापीठाने स्कार-फ्री फाउंडेशन सुरू केले आहे. अशा लोकांना क्लिनिकल चाचण्यांमध्ये समाविष्ट केले गेले आहे. ज्यांनी चेहऱ्याचा काही भाग गमावला आहे. असे रुग्ण म्हणतात, “सध्या प्लॅस्टिक कृत्रिम औषधांचा वापर केला जात आहे, परंतु शरीराचा एक भाग म्हणून ते जाणण्यास सक्षम नाही. हे लक्षात ठेवून, स्कार फाउंडेशन त्याच रुग्णांकडून स्टेम पेशींच्या मदतीने कृत्रिम नाक आणि कान विकसित करीत आहे, जेणेकरून, ते त्याच रुग्णांमध्ये प्रत्यारोपण केले जाऊ शकते.
वेदनारहित असं सारं काही
१. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, कृत्रिम अवयव तयार करण्यासाठी रुग्णाच्या शरीरातून कार्टिलेज घेण्याची आवश्यकता नाही.
२. कार्टिलेज दिल्यावर वेदनादायक शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागते.
३. शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, त्याचे चिन्ह शरीरावर येते. म्हणून रुग्णांकडून स्टेम पेशी घेतल्या जातात.
४. स्टेम पेशी आणि वनस्पतीतून मिळणारे नॅनोसेल्युलोजपासून बायोइंक बनविली जाते.
५. या बायोइंक, थ्रीडी प्रिंटर आणि सॉफ्टवेअरच्या सहाय्याने कृत्रिम अवयव तयार केले गेले आहे.
नॉन-टॉक्सिक बायोइंक!
१. वैज्ञानिकांनी असा दावा केला आहे की, कृत्रिम अवयव बनवण्यासाठी वापरलेली बायोइंक सुरक्षित आहे.
२. हे नॉन-टॉक्सिक आहे आणि रोग प्रतिकारशक्ती प्रतिरक्षा प्रणालीवर परिणाम करीत नाही.
३. कृत्रिम अवयव प्रत्यारोपण करण्याची नवीन पद्धत वेगळी आहे.
४. या तंत्रात शरीराच्या कोणत्याही त्वचेचा भाग घेऊन त्याचा वापर केला जात नाही.
५. रुग्णाला या वेदनादायक प्रक्रियेचा सामना करण्याची गरज भासत नाही.