मुक्तपीठ टीम
हवामान बदल आणि प्रदूषण यांच्या वाढत्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने उपाययोजनांवर वेगाने काम सुरू केले आहे. त्यासाठी एक महत्वाचा उपाय म्हणून वृक्षारोपणाचा वेग दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबरोबरच वृक्षारोपणाची नवीन उद्दिष्ट्यसुद्धा ठरविण्यात आली आहेत. यामध्ये सन २०२३-२४ पर्यंत २५३ कोटी रोपे दरवर्षी लागवड केली जातील. आतापर्यंत हे लक्ष्य केवळ १२१ कोटी रोपे दरवर्षी लावण्याचे होते. सध्या देशभरात दरवर्षी १५० कोटी रोपट्यांची लागवड केली जात आहे. वृक्षारोपण करण्याच्या वाढीव उद्दिष्टांसह राज्यांसाठी नवीन लक्ष्य निश्चित करण्याचे कामही सुरू झाले आहे. येत्या तीन वर्षांत देशभरात एकूण ६३८ कोटी रोपट्यांची लागवड करण्यात येणार आहे.
व्हिजन -२०२४ च्या माध्यमातून वाढणारी वृक्षारोपणाची गती दुप्पट करण्यासाठी वन व पर्यावरण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. त्याअंतर्गत येत्या तीन वर्षांत देशभरात एकूण ६३८ कोटी रोपट्यांची लागवड करण्यात येणार आहे. सध्या तयार करण्यात आलेल्या या रोडमॅप अंतर्गत २०२१-२२ मध्ये एकूण १७५ कोटी रोपे लागवड केली जातील. २०२२-२३ मध्ये एकूण २१० कोटी रोपे लागवड केली जातील. तसेच २०२३-२४ मध्ये एकूण २५३ कोटी रोपे लागवड केली जातील. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार वाढती आव्हाने लक्षात घेऊन वृक्षारोपणाची ही नवीन उद्दिष्टे निश्चित केली गेली आहेत. वन आणि पर्यावरण मंत्रालयाने वृक्षारोपण मोहिमांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरवात केली आहे.
मंत्रालयाच्या मते, या वृक्षारोपणाबरोबरच लवकरच राज्यांची नवीन उद्दिष्ट्येही निश्चित केली जाणार आहेत. तसेच, राज्यांच्या मागील उद्दीष्टांच्या आधारे याचा निर्णय घेतला जाईल. केंद्र सरकारच्या वृक्षारोपणासाठी कॉम्पेन्सरेटरी वनीकरण निधी व्यवस्थापन व नियोजन प्राधिकरण निधीतून ही रक्कम राज्यांना दिली जाते. पर्यावरण मंत्रालय देखील देशात हिरव्यागार वाढीबद्दल खूप उत्सुक आहेत.
पाहा व्हिडीओ: