मुक्तपीठ टीम
व्होडाफोन आयडिया म्हणजेच ‘वी’चे कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व उपक्रम राबवणाऱ्या वोडाफोन आयडिया फाऊंडेशनने शिक्षण क्षेत्रासाठी शिष्वृत्ती सुरु केली आहे. ‘लर्निंग विथ वोडाफोन आयडिया स्कॉलरशिप’ कार्यक्रमांतर्गत २०२१-२२ वर्षासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवले आहेत.
अधिकाधिक चांगली कामगिरी करण्यासाठी आवश्यक संसाधनांची उपलब्धता आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची क्षमता यांचा अभाव नुकसान करतो. शिक्षक आणि विद्यार्थ्यांना ज्या सामाजिक आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो त्या दूर करणे हा ‘वी’ सीएसआर उपक्रमाचा उद्देश आहे.
२०२० साली सुरु करण्यात आलेल्या या शिष्यवृत्तीत शिक्षक आणि विद्यार्थ्यांना डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर (डीबीटी) साठी पात्रता दिली जाते. या शिष्यवृत्ती शिक्षकांसाठी गुणवत्तेच्या आधारे तर विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता तसेच त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या साधनांचा विचार करून दिल्या जातात. ही निवड प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन होते. यासाठी स्वतंत्र ज्युरी असतात, ज्यामध्ये नामवंत शिक्षक, नागरी समाज संघटनांचे प्रतिनिधी यांचा समावेश असतो.
वोडाफोन आयडिया फाऊंडेशनतर्फे शिक्षकांना १ लाख रुपयांची रोख शिष्यवृत्ती आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी आवश्यक संसाधने मिळवण्यात मदत करण्यासाठी २०,००० रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते.
यावर्षीच्या शिष्यवृत्ती कार्यक्रमाची सुरुवात करताना वोडाफोन आयडिया लिमिटेडचे चीफ रेग्युलेटरी अँड कॉर्पोरेट अफेयर्स ऑफिसर श्री. पी बालाजी यांनी सांगितले, “आपले तंत्रज्ञान कौशल्य आणि नेटवर्क यांचा उपयोग करून सामाजिक प्रभाव निर्माण करण्यासाठी वी कटिबद्ध आहे. रोजगारक्षमतेमध्ये सुधारणा घडवून आणून, देशातील गरिबी कमी करण्यासाठीच्या मूलभूत उपायांपैकी एक म्हणजे शिक्षण उपलब्ध करून देणे. आमचे असे ठाम मत आहे की, आर्थिक अडसर असल्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याला किंवा शिक्षकाला त्यांच्या खऱ्या क्षमतांनुसार विकास घडवून आणण्यापासून रोखले जाऊ नये.”
पात्रता निकष:
शिक्षक
तीन वर्षांचा अनुभव असलेले, सरकारी / सरकारी अनुदान-प्राप्त शाळांमधील किंवा कमी उत्पन्न असलेल्या खाजगी शाळांमधील पूर्णवेळ शिक्षक या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. ते इयत्ता आठवी आणि त्यावरील वर्गांना शिकवत असले पाहिजेत. त्यांच्याकडे मान्यताप्राप्त शैक्षणिक पुरस्कार, पेपर्स, शिक्षण-अभ्यासातील नाविन्यपूर्ण उपक्रम आणि कन्टेन्ट निर्मिती अशा स्वरूपात त्यांच्या क्षमता दर्शवणारे पुरावे असले पाहिजेत.
विद्यार्थी
इयत्ता सहावी ते बारावीच्या वर्गांचे सरकारी / सरकारी-अनुदान-प्राप्त शाळांमधील विद्यार्थी मान्यताप्राप्त शैक्षणिक किंवा अभ्यासाव्यतिरिक्त इतर यश मिळवले आहे.
शिष्यवृत्ती विजेते या निधीचा उपयोग आयटी उपकरणे (लॅपटॉप, प्रिंटर) विकत घेण्यासाठी आणि अभ्यासक्रमांचे शुल्क, शालेय पुस्तके, मासिके, शाळेची ट्युशन फी आणि शाळेशी संबंधित इतर आवश्यक खर्चांसाठी करू शकतात.
अधिक माहितीसाठी व अर्ज करण्यासाठी कृपया याठिकाणी क्लिक करा: www.learningwithvodafoneidea.in/vi-scholarships
‘लर्निंग विथ वोडाफोन आयडिया स्कॉलरशिप’ २०२० च्या लाभार्थींच्या प्रतिक्रिया:
गेल्या वर्षीच्या विजेत्यांपैकी एक श्रीमती कल्पना राजौरीया यांनी सांगितले, “विद्यार्थ्यांना बऱ्याचदा पुस्तकांचा कंटाळा येतो आणि त्यांचा उत्साह टिकवून ठेवण्यासाठी आम्हा शिक्षकांना सतत नवनवे मार्ग शोधत राहावे लागतात. मला माझ्या विद्यार्थ्यांसाठी आणि माझ्या स्वतःसाठी कन्टेन्ट तयार करावा, ते खूपच उपयुक्त ठरेल असे अनेक दिवसांपासून वाटत होते. परंतु मोबाईल फोनवर ते करणे तितकेसे सोपे नव्हते. वोडाफोन आयडिया टीचर्स स्कॉलरशिप मिळाल्यावर मी आता एक लॅपटॉप विकत घेतला आहे आणि नुकताच माझा पहिला कन्टेन्ट तयार करून तो माझ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला आहे. खासकरून कोविड काळात माझ्या लॅपटॉपच्या मदतीने मी सहजपणे वर्ग घेऊ शकले आणि माझ्या विद्यार्थ्यांना बराच वेगवेगळा कन्टेन्ट दाखवू शकले. या शिष्यवृत्तीमुळे मला माझ्या विद्यार्थ्यांसाठी अधिकाधिक काम करण्याची प्रेरणा मिळाली.”
महाराष्ट्रातील शिष्यवृत्ती विजेता विद्यार्थी स्मृती प्रशांत पात्रो ने सांगितले, “यावर्षी आमची शाळा बंद झाली आणि घरून अभ्यास करायचा आहे असे अचानक सांगितले गेले. आमचे शिक्षक मोबाईल फोनवर अभ्यास घेत होते पण माझ्या पालकांना मला मोबाईल फोन देणे शक्य झाले नाही. काहीवेळा मला माझ्या शेजाऱ्यांकडून मोबाईल फोन आणावा लागत असे, त्यामुळे मला उशीर होई आणि खूपदा फोन उपलब्ध न झाल्यामुळे माझे वर्ग बुडत. वोडाफोन आयडिया स्टुडंट्स स्कॉलरशिप मिळाल्यावर मी सर्वात आधी मोबाईल फोन विकत घेतला, आता हा फोन वापरून मी माझ्या सर्व वर्गांना उपस्थित राहू शकते आणि शिक्षक ज्याप्रमाणे सांगतात त्याप्रमाणे इंटरनेट देखील वापरू शकते. गेल्या काही महिन्यांची माझी शाळेची फी देखील भरली गेली नव्हती, ते देखील मी या शिष्यवृत्तीच्या पैशांमधून भरली.”
वोडाफोन आयडिया सीएसआरमार्फत शिक्षण, कृषी, महिला सबलीकरण आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये परिवर्तनाला प्रोत्साहन देणारे उपक्रम चालवले जातात.
पाहा व्हिडीओ: